बारामतीत आणखी एकाचा टिपरने घेतला बळी... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, September 29, 2025

बारामतीत आणखी एकाचा टिपरने घेतला बळी...

बारामतीत आणखी एकाचा टिपरने घेतला बळी...                                                                             बारामती:-टिपर चालकाकडून आणखी एकाचा बळी गेल्याचं समोर आहे, नुकताच बारामती येथील फलटण रोड याठिकाणी हा अपघात झाला, टिपर चालक व मालक यांच्या वर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी लावून धरली आहे,तसेच टिपरच्या मालक व अधिकारी वर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत होत्या,फलटण रोडला एवढी मोठी वाहतुक असते तरीसुद्धा येथे स्पीड ब्रेकर नाही चार रस्ते येथे जुळतात,अपघाताची  जबाबदारी कोण घेणार अशी मागणी मागे  केली होती, डंपर टिपर आणि हायवा यांना दिवसा परवानगी नको तरीसुद्धा प्रशासनाने 12 ते 4 परवानगी दिली आता या अपघाताची जबाबदारी प्रशासन घेणार का?असा सवाल विचारला जाऊ लागला,टिपर च्या अपघातात मारुती उमाजी पारसे मयत 
राहणार आनंद नगर,फलटण रोड, बारामती वय ७५ आहे यांचा मृत्यू झाला मागे देखील खंडोबा नगर रोडवर घटना होऊन काहीच दिवस झाले असताना तो पर्यंत.. आणखी एका नागरिकांचा नाहक जीव गेला, याला सर्वस्वी प्रशासन गैरकारभार, व असणारे दुर्लक्ष जबाबदार आहे.असे मत व्यक्त करण्यात आले.त्याच बरोबर आरटीओ विभागाकडून म्हणावी अशी ओव्हर लोड वाहनावर कारवाई होत नाही अशी खंत व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment