खळबळजनक..आरटीओ अधिकारी सह खाजगी एजंट वर लाच मागितल्याचा गुन्हा दाखल..अहिल्यानगर(प्रतिनिधी):-लाच मागितल्या प्रकरणी नुकताच गुन्हा दाखल झाला याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक :-25/09/2025 मी(फिर्यादी) *** **** ***, वय 65 वर्षे, व्यवसाय शेती व मालवाहतुक रा. दौंड जि.पुणे समक्ष हजर राहून फिर्याद देतो की, मी दिनांक 23/09/2025 रोजी पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर यांचे कडे मला लाचमागणी होत असले बाबत समक्ष भेटुन
कळविले होते. त्यानुसार दिनांक 24/09/2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस उपअधीक्षक श्री. राजीव तळेकर यांचेकडे दोन पंचासमक्ष लाचमागणी बाबतची तक्रार दिली होती, ती पुढील प्रमाणे-मी *** *** ***, वय 65 वर्षे, व्यवसाय शेती व मालवाहतुक रा. दौंड जि. पुणे समक्ष कायनेटिक चौक अहील्यानगर येथे पोलीस उपअधीक्षक राजीव तळेकर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,
छत्रपती संभाजीनगर यांचेकडे दोन पंचासमक्ष माझ्याकडे आर.टि.ओ. कार्यालय अहिल्यानगर येथील आर.टि.ओ.श्रीमती गिता शेजवळ व खाजगी एजंट इस्माईल पठाण यांचेकडुन लाचेची मागणी होत असले बाबत तक्रार देतो की,
मी वरील प्रमाणे असुन मी केडगाव ता. दौंड जि. पुणे येथून अशोक लेलैंड कंपनीचे वाहन क्रमांक एम एच 12 एस एक्स 2436 हे विकत घेतले असुन सदरचे वाहन है मौजे पाटस येथील श्री
सिमेंट कंपनी येथुन सिमेंट बॅगभरुन अहिल्यानगर येथे घेवुन येत असतो. सदर वाहन हे काही दिवसापुर्वी (महीना तारीख आठवत नाही) ओहर लोड असल्याकारणाने मोटर वाहन निरीक्षक श्रीमती गिता शेजवळ यांनी अहील्यानगर
येथे पकडले होते व सोडुन दिले त्यावेळेस त्यांनी मला सांगीतले की, यापुढे तुमच्या वाहनावर कोणतीही कारवाई करायची नसेल तर तुम्ही मला आरटिओ कार्यालयातील खाजगी इसम नामे इस्माईल पठाण यांचे मार्फतीने येऊन भेटा असे सांगीतले होते. त्याप्रमाणे मी दिनांक 22/09/2025 रोजी प्रादेशिक परीवहन कार्यालय अहिल्यानगर येथे जाऊन मोटार परीवहन निरीक्षक व खाजगी इसम इस्माईल पठाण यांची भेट घेतली असता त्यांनी माझी वर नमुद ओव्हर लोड गाडी त्यांच्या हधीतुन कायम स्वरुपी चालू देण्यासाठी माझ्याकडे मासिक हप्ता म्हणुन 3,000/- रुपये मागणी केली होती..परंतु माझी मोटार वाहन निरीक्षक श्रीमती गिता शेजवळ व खाजगी एजंट इस्माईल पठाण यांना लाच देण्याची इच्छा नाही. परंतु मी जर मोटार वाहन निरीक्षक श्रीमती गिता शेजवळ व खाजगी एजेंट इस्माईल पठाण यांना जर मी माझे
ओहरलोड वाहन त्यांचे हद्दीमध्ये चालु देण्यासाठी मासिक हप्ता 3,000/- रुपये दिले नाहीतर ते माझे वाहन चालु देणार नाही असे सांगत आहे.
तरी मोटार वाहन निरीक्षक श्रीमती गिता शेजवळ व खाजगी एजंट इस्माईल पठाण यांना मला सदर कामासाठी लाच दयावयाची इच्छा नाही. मोटार वाहन निरीक्षक श्रीमती गिता शेजवळ व खाजगी एजेंट इस्माईल पठाण यांचेशी माझा कोणताही पैशाचा देण्याचा घेण्याचा किंवा उसनवारीचा व्यवहार नसुन पैर दुश्मनी नाही. आज रोजी मी त्यांची भेट घ्यायला जाणार आहे त्यावेळी मोटार वाहन निरीक्षक श्रीमती गिता शेजवळ व खाजगी
एजंट इस्माईल पठाण यांनी किंवा त्यांचे मार्फतीने इतर कोणी आरटिओ अधिकारी कर्मचारी यांनी माझ्याकडे सदर कामासाठी पैसे मागितले व ते स्विकारले तर त्यांना पकडुन त्यांचेवर योग्य ती कारवाई होणेस विनंती आहे.माझे वरील तक्रारीवरुन अॅन्टी करप्शन ब्युरो, छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस उपअधीक्षक श्री राजीव तळेकर यांनी मी दिलेल्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी लाच मागणीची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. मी दिलेल्या
तक्रारी प्रमाणे दिनांक 24/09/2025 रोजी मला आवश्यक त्या सुचना देऊन माझ्या सोबत पंच क्र.01 यांना सोबत देऊन माझ्याकडे पंचासमक्ष व्हाईस रेकॉर्डर चालु करुन देऊन मला प्रादेशिक परीवहन कार्यालय अहिल्यानगर येथील खाजगी एजंट इस्माईल पठाण यांची भेट घेण्यासाठी पाठविण्यात आले. अहील्यानगरच्या इमारतीजवळ जाऊन खाजगी एजेंट इस्माईल पठाण यांची भेट घेतली. त्यावेळी मी त्याला माझे सिमेंट वाहतुकीचे ओव्हरलोड वाहन अहील्यानगर हद्दीतुन सुरु करणे बाबत यवच भेट घेतली. त्यानी काल तीन हजार रुपये लागतील मॅडमला द्यायला असे म्हणला तेव्हा मी कमी कर थोडेफार असे म्हणलो असता, नाही होणार मॅडम मलाच भेटतात. तुमचे परफेक्ट काम करणार. तीन हजार रुपये लागण मला. तुमच्या हिशोबाने मॅडमला भेटा, असे म्हणुन माझे ओव्हरलोड वाहन अहिल्यानगर हद्दीतुन चालु देण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक श्रीमती गिता शेजवळ यांना सांगतो असे म्हणुन माझ्याकडे पंचासमक्ष 3,000/- रुपये लाचेची मागणी करुन स्विकारण्याचे मान्य केले होते.त्यावरुन अॅन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस उपअधीक्षक राजीव तळेकर यांनी माझ्याकडे झालेल्या लाचमागणीचे
अवलोकन केले असता खाजगी एजंट इस्माईल पठाण यांनी वाहन निरीक्षक गिता शेजवळ यांना सांगुन काम करुन देतो असे म्हणाले असल्याने वाहन निरीक्षक श्रीमती गिता शेजवळ यांचेकडे शहानिशा करणे गरजेचे असल्याचे आम्हास सांगुन सदर वेळी वाहन निरीक्षक गिता शेजवळ हया कार्यालयात हजर नसल्याने त्या कार्यालयात
आल्यानंतर त्यांची लाचमागणी पडताळणी झाल्यानंतर पुढील सापळा कारवाई करण्याचे पंचासमक्ष सर्वानुमते ठरले.त्यानुसार वाहन निरीक्षक श्रीमती गिता शेजवळ हया आरंटिओ कार्यालयात ड्युटीचे ठिकाणी आल्याची माहीती प्राप्त होताच ठरल्याप्रमाणे पडताळणी करणे व लाचेचे पैसे देण्याच्या पुढील कारवाईसाठी पोउपअधीक्षक श्री राजीव तळेकर यांनी श्रीमती गिता शेजवळ यांची लाचमागणी पडताळणी करण्याचा निर्णय घेतला व आम्हाला आवश्यक त्या सुचना देऊन माझ्या सोबत पंच क्र.01 यांना सोबत देऊन माझ्याकडे व्हाईस रेकॉर्डर चालु करुन देऊन मला प्रादेशिक परीवहन कार्यालय अहील्यानगर येथे श्रीमती गिता शेजवळ यांची भेट घेण्यासाठी रवाना केले.त्याप्रमाणे मी व पंच क्र.1 असे प्रादेशिक परीवहन कार्यालय अहील्यानगर येथे जाऊन खाजगी इसम
इस्माईल पठाण यांना सोबत घेऊन मोटार वाहन निरीक्षक श्रीमती गिता शेजवळ यांची भेट घेतली. त्यावेळी मोटार वाहन निरीक्षक श्रीमती शेजवळ यांचे सोबत माझ्या सोबत माझ्या वाहनाचे ओहरलोड सिमेंट वाहतुक सबंधाने चर्चा
केली तेव्हा मी त्यांना काही नाही आपलं एक काम होतं आपली एक गाडी चालते ओव्हरलोड. तिला काही म्हणजे थोडफार हे करुन चालु द्या. ते महिण्याचं काय ते देतो आम्ही "किती पैसे दयायचे काय करायच" असे म्हणालो असता त्यांनी मला " चालेल ना काका, चालत की, काही प्रॉब्लेम नाही, चालवा तुम्ही आता जावा, जावा सहकार्य करतो काका " असे म्हणुन अप्रत्यक्ष लाच मागणी करुन लाच मागणीस प्रोत्साहन दिले.व सापळा पथक थांबलेल्या ठिकाणी परत आलो.त्यानंतर पोउपअधीक्षक श्री राजीव तळेकर यांनी आमच्यामध्ये झालेल्या संभाषणाचे अवालोकन करुन खाजगी एजंट इस्माईल पठाण व वाहन निरीक्षक श्रीमती शेजवळ यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम हजर करणे बाबत
कळविले असता मी त्यांना माझेकडील 3,000/-रुपये ज्यात 500/- रुपये दराच्या 06 भारतीय चलनी नोटा हजर केल्या. त्यानंतर त्यांनी त्या नोटांना पंचासमक्ष पावडर लावुन, पुन्हा व्हाईस रेकॉर्डर चालु करून माझ्याकडे दिला व
पंच क्रं. 1 यांना सोबत देऊन खाजगी एजेंट व श्रीमती गिता शेजवळ यांना त्यांनी मागितल्याप्रमाणे 3,000/- रुपये लाच रक्कम देण्यासाठी प्रादेशिक कार्यालय अहील्यानगर च्या इमारतीकडे रवाना केले व आरोपी यांनी लाचेची रक्कम स्विकारताच माझ्या डोक्यावरील पांढरी टोपी काढुन लाच स्विकारली बाबत सुचित केले.
त्याप्रमाणे पंच क्र. 1 व मी असे पायी पायी प्रादेशिक परीवहन कार्यालय अहील्यानगरच्या इमारतीकडे जातांना वेलकम बोर्ड अहिल्यानगर कॉर्नर येथे खाजगी एजंट इस्माईल पठाण यांची भेट झाली. परंतु मोटार वाहन निरीक्षक हया तिथे दिसुन आल्या नाहीत. तेथे पठाण व माझ्यामध्ये कामा संबधाने चर्चा केली व लाच मागणीत
ठरल्या प्रमाणे 3,000/- रुपये मी माझ्या शर्टच्या वरील डाव्या बाजुच्या खिशातुन काढुन इस्माईल पठाण यांचे समोर धरली असता सदर लाचेची रक्कम त्यांनी त्यांचे उजव्याहाताने स्विकारुन त्यांचे हातातच ठेवले त्याचवेळी मी माझ्या डोक्यावरील पांढरी टोपी काढुन सापळा पथकास लाच स्विकारले बाबतचा पुर्वनियोजीत इशारा केला.त्यानंतर तात्काळ सापळा पथकाने इस्माईल पठाण यांना पकडुन त्यांचे कडुन हातातील लाचेची रक्कम जप्त केली. त्यानंतर पोउपअधीक्षक श्री राजीव तळेकर यांनी इस्माईल पठाण यांना त्यांचे नाव, गाव व पद विचारले असता त्यांनी अहील्यानगर असे सांगीतले व मोटार वाहन निरीक्षक श्रीमती गिता भास्कर शेजवळ हया राऊंडसाठी पॉईंटवर गेल्या
आहे असे सांगीतले.तरी खाजगी इसम इस्माईल पठाण रा. वार्ड नंबर 06, श्रीरामपुर जि. अहिल्यानगर यांनी दिनांक 24/09/2025 रोजी 17.39 वाजता वेलकम बोर्ड अहील्यानगर कॉर्नर या ठिकाणी माझ्याकडे माझे अहील्यानगर
हद्दीतुन ओव्हरलोड सिमेंट वाहतुक करण्यासाठी पंच व साक्षीदारा समक्ष 3,000/- रुपये लाचेची मागणी करूनJस्वत:चे आर्थिक फायद्यासाठी माझेकडुन 3,000/- रुपये लाच रक्कम स्वतः स्विकारली व मोटार वाहन निरीक्षक
श्रीमती गिता भास्कर शेजवळ रा. प्रादेशिक परीवहन कार्यालय, अहिल्यानगर यांनी माझ्याकडे अप्रत्यक्षरित्या मागणी
केलेल्या लाच रकमेस प्रोत्साहन दिले म्हणुन त्यांचे विरुध्द कायदेशिर फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल आहे.
No comments:
Post a Comment