बारामती:-बारामती तालुक्यातील सुपा पोलीस स्टेशन हद्दीत खून करून त्याची विल्हेवाट लावल्याची घटना घडली,मयत - गणेश शंकर चव्हाण वय 49 वर्षे, मुळ रा आद्रहळी ता. शिराटी जि. गदक राज्य कर्नाटक सध्या रा नारोळी ता. बारामती जि.पुणे याचा खून झाला याबाबत सविस्तर असे की,
दिनांक 22/9/2025 रोजी रात्री 21:30 ते आज दिनांक 26/09/2025 रोजी सकाळी 10:00 वा.चे दरम्यान मौजे नारोळी ता. बारामती जि.पुणे गावचे हद्दीत महिला नामे छाया रमेश महाडिक यांचे बांधकाम चालु असलेल्या फार्म हाऊस येथे गुन्हा घडला असून फिर्याद रूपेश दिनानाथ साळुंके वय 40 वर्षे, धंदा नोकरी पोलीस हवालदार सुपा पोलीस स्टेशन यांनी दिली, मिळालेल्या माहितीनुसार
या घटनेतील आरोपी नामे नागेश चंदबसप्पा बुधियाला मुळ रा राज्य कर्नाटक पुर्ण पत्ता माहीत नाही याने इसम नामे गणेश शंकर चव्हाण वय 49 वर्षे, मुळ रा आद्रहळी ता. शिराटी जि. गदक राज्य कर्नाटक सध्या रा नारोळी ता. बारामती जि. पुणे याचा अज्ञात कारणावरुन कोणत्यातरी हत्याराने खुन करुन पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने त्यास मुरूमाचे ढिगाऱ्याखाली पुरून ठेवले होते, वगैरे मजकुराचे फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर करण्यात आला असून गुन्हयाचा वर्दि रिपोर्ट JMFC कोर्ट सो बारामती येथे रवाणा करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास जिनेश कोळी पौसई सुपा पो स्टे हे करत आहेत.तर सुपा पो स्टे गु.र.नं.* 170/2025 बी.एन.एस कलम 103,238 कलमा नुसार गुन्हा दाखल झाला .
No comments:
Post a Comment