विनापरवाना दारु वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई;राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष कसे? बारामती:-बारामती तालुक्यात अवैध दारू विक्री जोरात चालू असून यावर खऱ्या अर्थाने राज्य उत्पादन शुल्क विभाग बारामती यांनी करायला हवी होती पण त्यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे, हे यावरून लक्षात येत आहे,मात्र माळेगाव नंतर वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत निरा-बारामती मार्गावर निंबुत ता.बारामती गावच्या हद्दीत बेकायदेशीर देशी विदेशी दारू वाहतूक करणारे वाहन वडगाव
निंबाळकर पोलिसांनी पकडले. यामधील दोघांवर
बेकायदेशीर दारू वाहतुकीचा गुन्हा नोंदवण्यात
आला आहे. मिळालेली दारू आणि वाहन असा
11 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला
आहे. शुभम रामचंद्र होळकर (रा.ता. फलटण, जि. सातारा) सोमनाथ बाळासो पवार (रा. करंजेपुल, ता. बारामती, जि. पुणे)अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. सोमवार दि.22 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता कारवाई करण्यात आली. एका वाहनातून अवैधरित्या दारू आणली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. निरा बारामती मार्गावर तपासणी सुरू केली. पुरंदर तालुक्यातून बारामती तालुक्यात प्रवेश करणाऱ्या पहिल्याच वळणावर पिकअप क्रमांक MH 11 DD 6926 अडवून तपासणी केली. वाहनातून विनापरवाना बेकायदेशीर देशी व विदेशी दारूचे बॉक्स मिळून आले. पोलिसांनी गाडीत असलेल्या शुभम व सोमनाथ यांना परवाना व कागदपत्रांबाबत
विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक
उत्तर न दिल्याने पोलिसांनी पिकअप गाडी व
दारूसह मुद्देमाल ताब्यात घेतला. जप्त केलेल्या
मुद्देमालाची एकूण किंमत 11 लाख 11 हजार
375 रुपये इतकी आहे. महाराष्ट्र दारूबंदी
कायद्यानुसार वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment