बारामतीत जुन्या वादावरून अनेकांवर कोयत्याने हल्ला.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 23, 2025

बारामतीत जुन्या वादावरून अनेकांवर कोयत्याने हल्ला..

बारामतीत जुन्या वादावरून अनेकांवर कोयत्याने हल्ला..                       
बारामती:-बारामतीत खून,खुनाचे प्रयत्न असे सत्र सुरूच असल्याचे मागील काही घटनेवरून दिसून येत आहे, खून, खुनाचा प्रयत्न असे प्रकाराने बारामती व तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसत आहे, नुकताच बारामती तालुका ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली या घटनेची फिर्याद अमोल आण्णा चौधर वथ 37 वर्षे व्यवसाय- वॉटर सप्लायर रा. वंजारवाडी चौधरवस्ती ता. बारामती जि. पुणे यांनी दिली याबाबत समजलेली हकीकत अशी की,आरोपी - 1 ऋतिक उर्फ गुड्या मुळिक रा. कुंभरकर यस्ती वंजारवाडी 2) ओम अर्जुन कुचेकर रा. सुर्यनगरी बारामती 3) अली मुजावर रा. रा. कुंभरकर वस्ती वंजारवाडी 4) दिपक भोलनकर रा. रा. कुंभरकर वस्ती वंजारवाडी 5) शुभम वाध रा. मालुसरे वस्ती वंजारवाडी व इतर यांनी जुन्या वादाच्या कारणावरून हल्ला केल्याचं सांगितले,
मी तसेच माझे भाऊ किती 1) भारत गोकुळ चौधर 2) सागर चंद्रकांत चौधर 3) आदित्य सर्जेराव चौधर 4) सुनिल गोरख चौधर सर्व वंजारवाडी ता. बारामती जि पुणे असे आम्ही व इतर आमचे मुले असे नवरात्र उत्सव चालु असल्याने देवीची ज्योत राशीन येथुन मौजे वंजारवाडी येथे दत्त मंदिरासमोर घेउन आलो व सदर मंदिरासमोर आम्ही पुजा पाठ करु पारंपारिक वाद्यावर उत्सव साजरा करित होतो. त्याचवेळी रात्री. 08:30 वा. चे. सुमारास एक चारचाकी गाडी नं. माहित नाही ही आम्ही थांबले ठिकाणी आली व तिचे मधुन काही इसम खाली उतरले त्यात 1 ऋतिक उर्फ गुड्या मुळिक रा. कुंभरकर यस्ती वंजारवाडी 2) ओम अर्जुन कुचेकर रा. सुर्यनगरी बारामती 3) अली मुजावर रा. रा. कुंभरकर वस्ती वंजारवाडी 4) दिपक भोलनकर रा. रा. कुंभरकर वस्ती वंजारवाडी 5)  शुभम वाध रा. मालुसरे वस्ती वंजारवाडी  व त्यांचेसोबत अनोळखी इसम दोन असे आमचे जवळ आले त्यावेळी त्यांचे हातात लोखंडी कोयते व चाकू अशी हत्यारे होती. आम्ही सर्व जण उभे असताना आमच्यात असलेले जुन्या वादाचे कारणावरुन माझ्या भावकीतील सुनिल गोरख चौधर यास ओम अर्जुन कुचेकर याने त्याच्या हातातील लोखंडी कोयत्याने सुनिल यांचे अंगावर डाव्या बाजुस कमरेच्या वर जोरात मारुन गंभौर दुखापत करुन मला त्यातील ऋतिक उर्फ गुड्या मुळिक याने त्याचे हातातील लोखंडी कोयत्याने माझे डाव्या हाताच्या मनगटावर गंभीर जखम केली तसेच कमरेच्या डाव्या बाजुस कोयता मारत असताना तो मी हुकविल्याने तो कोयता तेथे घासुन गेला तसेच आमचेतील भारत गोकुळ चौधर यास ऋतिक मुळीक व ओम अर्जुन कुचेकर यांनी त्यांचे हातातील लोखंडी कोयत्याने मारहाण करित असताना ऋतिक मुळिक याने कोयता भारत याचे डावे हाताचे कोपरा जवळ जोरात मारुन तेथे फैक्चर करून गंभिर दुखापत करुन ओम अर्जुन कुचेकर यानेही कोयत्याने उजये हाताचे मनगट जवळ मारहाण करुन दुखापत केली तसेच सागर चंद्रकांत चौधर यास दिपक भोलणकर याने त्याचे हातातील चाकुने सागर यांचे छातीवर उजवेबाजुसजोरात मारुन गंभिर दुखापत करुन डावे काखेच्या बरगडीस दुखापत केली व आदित्य सर्जेराव चौधर यास दिपक भोलणकर याने चौकुने कमरेच्या उजवे बाजुस मारुन दुखापत केली असे आम्हास मारहाण करित असताना त्यांचेतील अली मुजावर याने त्याचे हातातील लोखंडी कोयत्याने भारत गोकुळ चौधर यास मारुन दुखापत केली शुभम वाघ  त्याचे हातातील लोखंडी कोयत्याने सुनिल चौधर यास मारहाण करुन दुखापत केली तसेच त्यांचे सोबत आलेले दोन अनोळखी इसम यांनी आम्हास लाथाबुक्यांनी मारहाण करुन आम्हास शिवीगाळ दमदाटी करुन वरिल सर्व जण यांनी 1) ऋतिक उर्फ गुड्या मुळिक रा. कुंभरकर वस्ती वंजारवाडी 2) ओम अर्जुन कुचेकर रा. सुर्यनगरी बारामती 3) अली मुजावर रा. रा. कुंभरकर वस्ती कंजारवाडी 4) दिपक भोलनकर रा. रा. कुंभरकर वस्ती वंजारवाडी 5 शुभम वाघ रा. मालुसरे वस्ती वंजारवाडी अनोळखी इसम दोन यानी त्यांचे हातातील लोखंडी कोयते व चाकू असे हत्यारांनी आम्हास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने जबर मारहाण करुन गंभिर दुखापत केली आहे म्हणून तक्रार दाखल केल्याने गुन्हा दाखल केला असून
तपास पोसई युवराज पाटील करीत आहे.

No comments:

Post a Comment