अंजनगाव मध्ये आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी.... अंजनगाव:-दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी राजे उमाजी नाईक यांच्या पुतळ्यास अंजनगावचे माजी सरपंच श्री दिलीपदादा परकाळे श्री दादासाहेब(काका) मोरे श्री सुभाषतात्या वायसे श्री. सुभाषआबा परकाळे, श्री. जालिंदर वायसे, प्रशांत कुचेकर या सर्वांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी प्रवक्ते श्री आकाश वाघमारे व श्री कन्हैया खोमणे यांनी उमाजी नाईक यांच्या कार्याची माहिती सांगितली आणि युवा वर्गाला मार्गदर्शन केले. या वेळी समाजातील श्री. अप्पासाहेब चव्हाण, वसंत चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सत्पाल चव्हाण, पोलीस पाटील ईश्वर खोमणे , अॅड. आनंद चव्हाण, संदीप चव्हाण, राजेश चव्हाण, नितीन चव्हाण, महेंद्र चव्हाण, दशरथ चव्हाण, अमर सस्ते, सूरज कुचेकर, सिद्धार्थ कुचेकर, सूरज मोरे, अक्षय परकाळे, चेतन वायसे, रोहित माकर , हनुमंत चव्हाण यांच्यासह मोठ्या प्रमाणात युवा वर्ग समाज बांधव व भगिनी तसेच ग्रामस्थ उपस्थीत होते. यावेळी भव्यदिव्य अशी उमाजी नाईक यांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली होती.
Post Top Ad
Sunday, September 21, 2025
अंजनगाव मध्ये आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी....
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment