बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती वसंतदादा पाटील स्मृती पुरस्काराने सन्मानित
बारामती:- महाराष्ट्र राज्यात उत्कृष्ठ कार्य करणा-या राज्यातील ३४ कृषि उत्पन्न बाजार समित्यांना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि संघाचे संथापक अध्यक्ष कै. वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार २०२४-२५ देऊन सन्मानित करण्यात आले. बाजार समिती संघाने गुणांकन पद्धती राबविलेली होती. त्यामध्ये बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीस विभागात प्रथम क्रमांक मिळाला. वसंतदादा पाटील स्मृती पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ, पुणे यांचे ५६ व्या वार्षिक सभेत करणेत आले. सदरचा पुरस्कार बारामती बाजार समितीचे सभापती विश्वास आटोळे, उपसभापती रामचंद्र खलाटे व सचिव अरविंद जगताप यांनी संघाचे अध्यक्ष व सभापती प्रवीण नाहटा, उपसभापती संतोष सोमवंशी यांचे हस्ते हा पुरस्कार स्विकारला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा.अजितदादा पवार यांचे मार्गदर्शन, सहकार्य व मदत मिळाले म्हणुनच बारामती बाजार समितीस उत्कृष्ठ कार्याचा पुरस्कार मिळाला आहे असे मत सभापती विश्वास आटोळे व उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी व्यक्त केले.बारामती मुख्य यार्ड आणि जळोची व सुपे उपबाजार येथे समितीने विविध योजना व उपक्रम राबविणेत आलेले आहेत. त्याचा फायदा शेतकरी, व्यापारी व बाजार घटकांना होत आहे. स्मार्ट प्रकल्पा मध्ये बारामती बाजार समितीस राज्यात तिसरा तर विभागात प्रथम क्रमांक मिळाला आहे. भविष्यात ही अशाच प्रकारे शेतकरी व बाजार घटकांना वेगवेगळे उपक्रम राबवुन आधुनिक सोई- सुविधा देण्यास समिती प्रयत्नशील राहील असे सचिव अरविंद यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment