"एक व्यक्ती एक पद" हे धोरण राबविणार का?कार्यकर्त्यांनी केल्या भावना व्यक्त... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, September 20, 2025

"एक व्यक्ती एक पद" हे धोरण राबविणार का?कार्यकर्त्यांनी केल्या भावना व्यक्त...

"एक व्यक्ती एक पद" हे धोरण राबविणार का?कार्यकर्त्यांनी केल्या भावना व्यक्त...       बारामती:-सद्या लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लागण्याचे संकेत येत असल्याने राजकिय पक्षामध्ये हालचाली सुरू झाल्या असून प्रत्येक पक्ष आपआपल्या परीने पक्षाची ध्येय धोरणे राबविण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागा अश्या सूचना देत असून त्यासंबंधी बैठका घेत आहे, पण याच्यापलीकडे दुसरीकडे प्रामाणिक कार्यकर्ते जे आपल्या पक्षासाठी काम करतात त्या कार्यकर्त्यांना पदे मिळण्याची अपेक्षा असताना देखील त्यांना डावलले जात आहे, पक्षात"एक पद एक व्यक्ती" अशी संकल्पना राबविण्यात येईल अशी फक्त नेत्यांनी गरळ ओखली पण प्रत्यक्षात तशी संकल्पना राबविले नसल्याचे अनेक नाराज कार्यकर्ते बोलून दाखवीत असून फक्त पैशावाला व विशिष्ट गटाचा असेल तर व कुणाचा वशिला असेल त्यांनाच अनेक पदे दिली जात असल्याचे अनेक उदाहरणे आहे, असा दुजाभाव होणार असेल तर कार्यकर्ता काय निर्णय घेईल ज्याचा पक्षावर काय परिणाम होइल हे पुढील काळात दिसल्या शिवाय राहणार नाही अशी ही प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे, एकाच व्यक्तीला अनेक पदे देऊन सर्व सामान्य कार्यकर्त्याला मात्र चादरी व खुर्च्या उचलायच्या का तसेच अनेक वेळा आंदोलन करून कार्यकर्ता स्वतःचा अंगावर केसेस करून घेतो पोलीस त्याला पकडून नेतो अश्या अनेक त्रासाला हा कार्यकर्ता पक्षासाठी आपले आयुष्य बरबाद करतोय अश्या भावना व्यक्त होत आहे याची पक्षाच्या नेत्यांनी दखल घेतली पाहिजे.

No comments:

Post a Comment