विकसित बारामतीत महिलांसाठी महत्वाच्या भागात टॉयलेट ची सोयच नाही... बारामती(संतोष जाधव):- महाराष्ट्रात बारामती हे नाव विकसित बारामती म्हणून नावाजले जात आहे, त्याला कारण ही तसेच आहे या विकसित बारामतीत भव्य अश्या शासकीय इमारती, हॉस्पिटल,रस्ते, फुटपाथ,झाडे, शुभोशिकरण, कॅनॉल चे शुभोशिकरण,नदीच्या पात्रात होत असलेल्या शुभोशिकरण,एमआयडीसीअसे एक ना अनेक कामे झपाट्याने होत आहेत हे आपल्या बारामतीला आदरणीय अजितदादा हे आपल्याला धडाडीचे नेतृत्व लाभले हे बारामतीकराचं भाग्य आहे.असा नेता होणे अशक्य आहे, बाहेरून येणाऱ्या पाहुणे बारामतीचा होत असलेली विकास पाहून भारावून जातो ही आपल्या साठी अभिमानाची बाब आहे, असो पण याच विकसित बारामतीत एक राहिलं ते म्हणजे माझ्या माता, भगिनींच्या टॉयलेट ची सोय जे कुणालाही सांगू शकत नाही अश्या या नाजूक प्रश्नांची दखल कोण घेणार आहे का नाही,आज उदाहरण घ्यायचे झाले तर गांधी चौक ते एमआयडीसी चौक या रस्त्यावर खूप विकास झाल्याचा दिसतोय याच रस्त्यावर मोठे मॉल, दुकाने आहेत तसेच फिरायला येणारे जाणारे महिलावर्ग मोठ्या संख्येने आहेत मात्र इमर्जन्सी स्वच्छता गृह(टॉयलेट) असायला हवं होतं पण तसं याठिकाणी दिसून येत नाही, येथेच काय तांदुळवाडी वेस ते मारवाड पेठ ते गुणवडी चौक या ठिकाणी रस्त्यावर कुठेही स्वच्छता गृह(टॉयलेट)नाही हे गेले अनेक वर्षांपासूनची समस्या आहे.मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे, याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूनही महिलांच्या असणाऱ्या समस्या कधी सुटणार असा सवाल विचारला जात आहे.याबाबत ही समस्या कधी सुटेल हे येणाऱ्या काळात कळेल परंतु विकसित बारामतीत महिलांसाठी स्वच्छता गृह(टॉयलेट) लवकरात लवकर करणे गरजेचे आहे कारण येणारा काळ सणासुदीचा आहे, माझ्या माताभगिनी खरेदीसाठी अनेक तास बाजार पेठेत ये जा करीत आहे,त्यांच्या समस्या ते कोणालाही सांगू शकत नाही पण याचा अर्थ त्यांच्या साठी असणाऱ्या सुविधा ह्या भिगवण रोड व मारवाड पेठ याठिकाणी होणे गरजेचे आहे.याची प्रशासनाने दखल घ्यावी यासाठी लवकरच सामाजिक संघटना उपोषणाला बसणार असल्याचे कळतंय.
Post Top Ad
Tuesday, September 30, 2025
विकसित बारामतीत महिलांसाठी महत्वाच्या भागात टॉयलेट ची सोयच नाही...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment