बारामती शहर पोलिसांनी लोन क्लोज करुन देतो असे म्हणून फसवणूक करणारे आरोपीस केले जेरबंद.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, November 10, 2025

बारामती शहर पोलिसांनी लोन क्लोज करुन देतो असे म्हणून फसवणूक करणारे आरोपीस केले जेरबंद..

बारामती शहर पोलिसांनी लोन क्लोज करुन देतो असे म्हणून फसवणूक करणारे आरोपीस केले जेरबंद..       बारामती:-लोन क्लोज करुन देतो असे म्हणून फसवणूक करणारे आरोपीस बारामती शहर पोलीसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सन २०२३ साली बारामती शहरामध्ये विराज फायनान्स नावाने फर्म चालू करुन त्याद्वारे वेगवेगळ्या घटकातील लोकांनी घेतलेले लोन कमी करुन देतो अशी बतावणी करुन लोकांकडून पैसे घेवून त्याचा अपहार करुन लोकांची फसवणूक केलेला काटेवाडी ता. बारामती जि. पुणे येथील रविंद्र भिमराव डोंबाळे व त्याचे पत्नीवर सन २०२३ रोजी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा
दाखल करणेत आलेला होता.सदर आरोपीचा वेळोवेळी शोध घेतला असता तो पोलीसांना गुंगारा देवून पळून जात होता. परंतू बारामती शहर पोलीस स्टेशनचे गुन्हा प्रकटीकरण विभागचे पोलीस अधिकारी व पोलीस
अंमलदार यांनी सदर आरोपीचा गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करुन ता.०९/११/२०२५ रोजी ताब्यात घेवून अटक करण्यात आलेली आहे. सदर आरोपीकडे बारामती शहर पोलीस स्टेशन तपास करीत आहेत.सदरची कामगिरी ही मा. संदिपसिंग गिल . (पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण), मा. रमेश
चोपडे . (अप्पर पोलीस अधिक्षक पुणे), मा. गणेश बिरादार . (अप्पर पोलीस अधिक्षक बारामती), मा.सुदर्शन राठोड . (उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग, बारामती), मा. श्रीशैल चिवडशेट्टी (पोलीस निरीक्षक बारामती शहर पोलीस स्टेशन) यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन
गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सतिष राऊत, पोलीस अंमलदार अमीर शेख, अभिजित कांबळे, दत्तात्रय मदने, अक्षय सिताप, गिरीष नेवसे यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment