सुशीलकुमार अडागळे यांची शिवसेना सोशल मीडिया बारामती विधानसभा प्रमुख पदी निवड.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, November 9, 2025

सुशीलकुमार अडागळे यांची शिवसेना सोशल मीडिया बारामती विधानसभा प्रमुख पदी निवड..

सुशीलकुमार अडागळे यांची शिवसेना सोशल मीडिया बारामती विधानसभा प्रमुख पदी निवड 
बारामती विधानसभा सोशल मीडियाच्या नियुक्त्या जाहीर.

बारामती : वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने शिवसेना मुख्य नेते मा.श्री एकनाथजी शिंदे साहेब (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य), खासदार,डॉक्टर,श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र राज्याचे सोशल मीडिया राज्य प्रमुख राहुल कनाल व प्रतीक शर्मा सोशल मीडिया उपराज्य प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व सोशल मीडिया पश्चिम महाराष्ट्र प्रमुख श्री.महादेव सलवदे यांच्या विनंतीनुसार नुकतीच "शिवसेना सोशल मीडिया बारामती विधानसभा" निहाय पदाधिकारी जाहीर करण्यात आले.

यामध्ये श्री. सुशीलकुमार विलास अडागळे यांची बारामती विधानसभा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली,तसेच श्री.भीमसेन अर्जुन जाधव यांची शहरप्रमुख,श्री.संदिप रामदास चोपडे,तालुका प्रमुख
श्री.अमोल तुकाराम डोळे,उपतालुका प्रमुख
श्री.रामचंद्र अशोक भोसले,यांची विधानसभा समन्वयक म्हणून निवड करण्यात आली.
या सर्व नियुक्त्या शिवसेनेचे पुरंदरचे आमदार विजय बापू शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे, उपजिल्हाप्रमुख देवेंद्र बनकर यांच्या हस्ते काल दिनांक ८/११/२०२५ रोजी बारामती येथील शिवसेना संपर्क कार्यालयातील एकनाथ भवनात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नियुक्तीपत्रे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी श्री महादेव सलवदे,पश्चिम महाराष्ट्र प्रमुख शिवसेना सोशल मीडिया,श्री सुरेंद्र जेवरे, शिवसेना जिल्हाप्रमुख पुणे, देवेंद्र बनकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख, श्री.भुषण सुर्वे, शिवसेना सोशल मीडिया बारामती लोकसभा प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले.

यावेळी श्री अवधूत सर्जेराव पाटील शिवसेना सोशल मीडिया इंदापूर विधानसभा प्रमुख,श्री सुशीलकुमार अडागळे, बारामती विधानसभा प्रमुख, श्री मिलिंद साबळे पुणे जिल्हा प्रमुख मागासवर्गीय विभाग, श्री.संग्राम चांदगुडे तालुका प्रमुख,श्री.भिमसेन जाधव,शहर प्रमुख, श्री.अमोल डोळे, उपतालुकाप्रमुख,
हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment