पत्नीस जाळून खून केल्याबद्दल आरोपीस जिल्हा न्यायाधीश बारामती श्री.बी.डी. शेळके यांनी जन्मठेपेची सुनावली शिक्षा..
बारामती:-दिनांक १०/११/२०२५ रोजी बारामती येथील मे. जिल्हा न्यायाधीश नं. २ मा. श्री. बी.
डी. शेळके साो., यांनी आरोपी नामे बाबासाहेब उर्फ बाळासाहेब निवृत्ती भेगडे रा. लिंगमळा
दापोडी टोलनाका जवळ ता. दौंड जि. पुणे. या आरोपीने पत्नीस दारूपिण्यास पैसे न दिल्याने
अंगावर पेट्रोलटाकून पेटवुन दिले. त्यात तीचा मृत्यू झाला. त्यामध्ये मे. कोर्टाने आरोपीस
जन्मठेपेची शिक्षा व ५०००/- दंड, दंड न भरल्यास ३ महिने सश्रम कारावास अशी शिक्षा
सुनावली आहे. सदरील केसमध्ये सरकार पक्षातर्फे एकूण ८ साक्षीदार तपासणेत आले. त्यामध्ये मयताची मुलगा व सुन यांची साक्ष महत्वाची ठरली असे. सदरील केसमध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड श्री. कमलाकर शंकरराव नवले यांनी काम पाहिले. केसमध्ये फिर्यादी व इतर साक्षीदार यांचे जबाब व सरकारी वकील अॅड श्री. कमलाकर शंकरराव नवले यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन मे. न्यायालयाने भा.द.वि. कलम ३०२ अन्वये वरीलप्रमाणे आरोपीस जन्मठेपेची व पाच हजार रुपये दंड, व दंड न भरल्यास ३ महिने शिक्षा सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.सदर प्रकरणी यवत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नारायण देशमुख यांचे
मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक पुनम पाटील, तसेच पैरवी अधिकारी पोसई श्री. गोरख खेलबा कसपटे, कोर्ट पैरवी पोलीस हवालदार वेनुनाद तुकाराम ढोपरे यांनी मोलाचे सहकार्य केले, तसेच म्हणून कामकाज पाहिले.
No comments:
Post a Comment