खळबळजनक..दोन लाखाची लाच घेताना प्रभारी सहायक पोलीस निरीक्षकासह चार पोलिसांना अटक.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, November 12, 2025

खळबळजनक..दोन लाखाची लाच घेताना प्रभारी सहायक पोलीस निरीक्षकासह चार पोलिसांना अटक..

खळबळजनक..दोन लाखाची लाच घेताना प्रभारी सहायक पोलीस निरीक्षकासह चार पोलिसांना अटक..      पुणे :-लाखो रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी एकच खळबळ उडाली याबाबत मिळालेली माहिती अशी की, आईचा खुन केल्याचा गुन्हा तक्रारदाराच्या मित्रावर दाखल झाला होता. या गुन्ह्यात तक्रारदाराला सहआरोपी करु नये, यासाठी चार पोलिसांनी ५ लाखांची लाच मागितली.पैसे घेऊन येण्यासाठी १० तोळे वजनाचे सोन्याचे कडे पोलिसांनी ठेवून घेतले. त्याचवेळी तक्रारदाराच्या भावाकडून परस्पर ३ लाख रुपयांची लाच घेतली.त्यानंतरही २ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून लोहारा पोलीस
ठाण्याच्या प्रभारी सहायक पोलीस निरीक्षकासह चार पोलिसांना अटक केली आहे.याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांच्या आदेशाने पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लोहारा येथे जाऊन ही कारवाई केली आहे.सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भीमराज कुकलारे (वय ४३),
पोलीस अंमलदार आकाश मधुकर भोसले (वय ३२), अर्जुन शिवाजी तिघाडे (वय ३४), सहायक
पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती बळीराम बोळके (वय ५७) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या सर्वांची धाराशिव जिल्ह्यातील लोहारा पोलीस
ठाण्यात नियुक्ती होती.तक्रारदार याचा मित्र व त्याची आई त्यांच्यात भांडणे झाली होती. ती सोडविण्यासाठी तक्रारदार गेले होते. त्यानंतर
तक्रारदार परत निघून गेले. पुढे काय झाले, हे तक्रारदार यांना माहिती नव्हते. मित्राने केलेल्या मारहाणीत आईचा मृत्यु झाला होता. पोलिसांनी मित्राविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. तक्रारदाराच्या मित्राविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये तक्रारदारास सह आरोपी न करण्यासाठी पोलिसांनी ५ लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराकडे ५ लाख रुपये
नसल्याने तक्रारदाराने स्वत:कडील १० तोळे वजनाचे सोन्याचे कडे काढून दिले होते. ते पोलिसांनी ठेवून घेतले व तक्रारदाराला पोलीस ठाण्यातून पाठवून दिले.तक्रारदार हे ५ लाख रुपयांची जुळवाजुळव करीत असताना पोलिसांच्या तक्रारदाराच्या भावाकडे जाऊन त्यांच्याकडून परस्पर ४ लाख रुपये घेतले. त्यानंतरही हे पोलीस तक्रारदाराकडे आणखी ५ लाख रुपयांची लाच मागत होते. शेवटी त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने ६, ७ आणि १० नोव्हेंबर रोजी पडताळणी केली. त्यात पोलीस अंमलदार आकाश भोसले व सहायक पोलीस उपनिरीक्षक निवृती बोळके यांनी तक्रारदाराकडे यापूर्वी मागितलेले पैसे आणून देईपर्यंत तक्रारदाराचे १० तोळ्याचे सोन्याचे कडे स्वत:कडे ठेवून घेतल्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.तसेच पोलीस पोलीस ठाण्यातील प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी तक्रारदाराकडे ५ लाखांची प्राथमिक मागणी केल्यानंतर पडताळणी कारवाईमध्ये तक्रारदारांच्या भावाकडून ३ लाख रुपये स्वीकारल्याचे
मान्य केले. तक्रारदाराकडून आणखी २ लाख रुपयांची लाच मागितली. ही रक्कम भोसले किंवा तिगाडे यांच्याकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. ही पडताळणी केल्यानंतर ११ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी सापळा आयोजित केला. अर्जुन तिघाडे याने तक्रारदार यांचे भातागली गावातील शेतामध्ये तक्रारदार यांच्याकडून २ लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.त्यानंतर पोलिसांनी तातडीने चारही पोलिसांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक प्रशांत चौगुले व पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर यांच्या पथकाने केली.पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे अधिक तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment