बारामती :- महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुर्देवी दुःखद निधन अपघातात झाले, या बाबत आमदार रोहित पवार व अमोल मेटकरी सह अनेकांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला, याप्रकरणी बारामती पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली परंतु गुन्हा दाखल करून न घेतल्याने अखेर त्यांनी कर्नाटक मध्ये दाखल गुन्हा दाखल केला याबाबत मिळालेली माहिती अशी की,बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आमदार रोहित पवार यांच्याकडून बेंगळुरू येथे 'झीरो एफआयआर' दाखल करण्यात आली आहे.हा अपघात नसून, घातपात होता, असा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, हा गुन्हा आता बारामती पोलिसांकडे वर्ग होईल.मुंबईहून २८ जानेवारीला बारामतीकडे जाणारे खासगी 'लिअरजेट ४५' विमान बारामती विमानतळाजवळ कोसळले होते. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह
पायलट, सहपायलट आणि अन्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.रोहित पवार यांनी यापूर्वी मुंबईतील मरिन ड्राइव्ह पोलिस ठाणे आणि बारामती पोलिसांकडे तक्रार देण्याचा प्रयत्न
केला होता. मात्र, एफआयआर नोंदवली गेली नाही. पुणे सीआयडीकडून केवळ ' अॅक्सिडेंटल डेथ'च्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर अखेर कर्नाटकातील बेंगळुरू येथील हाय ग्राउंड्स पोलिस ठाण्यात 'झीरो एफआयआर' दाखल करण्यात आली
असून, पुढील तपासासाठी ती महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे.
विमान उतरण्यासाठी पाच किलोमीटरची दृश्यमानता आवश्यक असते. मात्र, दोन-तीन किलोमीटर दृश्यमानतेवर परवानगी दिली गेली. उड्डाणास विलंब, धावपट्टी बदलण्याचा निर्णय, आणि ऐन वेळच्या घडामोडी यामुळे हा अपघात केवळ दुर्घटना नसून, कटकारस्थानाचा भाग असू शकतो, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.याबाबत मुख्यमंत्र्यांनी एफआयआर दाखल करून घ्यावा असे बोलले,दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी कर्नाटकमध्ये तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.या अपघातप्रकरणी मी मरिन लाइन्स पोलिस ठाण्यामध्ये गेलो, मात्र तेथे तक्रार नोंदवून घेतली नाही. तुम्हाला सत्तेत बसविणाऱ्या अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताचा
अद्याप एफआयआर दाखल करण्यात आला नाही,असे ते अंतिम आठवडा प्रस्तावादरम्यान म्हणाले. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकत्रित बैठक घेऊन एफआयआर दाखल करून तपासाबाबत न्याय द्यावा,अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment