बारामतीत बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा.. बारामती :- बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी यांस २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली याबाबत मिळालेली माहिती अशी की,मयुर पांडुरंग फडके रा. कानगांव ता. दौंड जि. पुणे. यांस बारामती येथील मे.जिल्हा न्यायाधीश - २ मा. बी.डी.शेळके सो. यांनी आज बाल लैंगिक अत्याचार कलम ६ व ४ बलात्कार प्रकरणी २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व वीस हजार रूपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच पोक्सो कायदा ४ प्रमाणे आरोपीस १० वर्षे सश्रम कारावासाची व १० हजार रूपये दंडाची व दंड न भरल्यास २ महिने साधी कारावास ची शिक्षा सुनावली.
तसेच इतरही गुन्हयात शिक्षा दिली.या प्रकरणाची हकीकत सदरचा गुन्हा हा ता. १७/०३/२०२२ रोजीच्या पुर्वी आरोपी मयुर पांडुरंग फडके याने फिर्यादीची अल्पयीन मुलगी अ.ब.क. हिस तिच्या अल्पवयाचा गैरफायदा घेवुन तिच्या रहाते घरात वेळोवेळी बळजबरी केली तसेच तिचेवर बळजबरीने तीन वेळा जबरी संभोग केला आहे व झालेला प्रकार कोणाला सांगितलेस तुला व तुझे भाउ व आईवडील यांस जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. म्हणुन फिर्याद देणेस उशीर झालेला होता परंतु पिडीतेने आईवडीलांना घटना सांगितल्यानंतर यवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.सदर प्रकरणाचा तपास हा केशव वाबळे तपासी अधिकारी यवत यांनी केला आरोपी विरुध्द भा.द.वि. कलम ३७६ (२) (एन), ३५४, ५०६ आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४. ६, ८, १२ प्रतिबंधक कायदा प्रमाणे दोषारोपपत्र दाखल केले. आरोपी न्यायालयीन बंदीत होता.सरकारचा विशेष सरकारी वकील कमलाकर शंकरराव नवले यांनी सरकार पक्षातर्फे १० साक्षीदार तपासले,फिर्यादी म्हणजेच पिडीतेची आई वडील यांनी न्यायालायला सविस्तर सांगितलं तसेच पीडीता ही ११ वर्षाची असूनही तिने झालेली घटना न्यायालयात सांगितले वैद्यकीय पुरावा व परिस्थितीजन्य पुराव्या वरून आरोपी यांस मा. जिल्हा न्यायाधीश-२ शेळके साो यांनी आरोपी नामे मयुर पांडुरंग फडके यांना दोषी धरून शिक्षा सुनावली आहे.विशेष सरकारी वकील कमलाकर शंकरराव नवले यांनी सदर खटल्याचे पूर्ण
कामकाज पाहिले व त्यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन न्यायालयाने आरोपी मयुर पांडुरंग फडके यांस वरील प्रमाणे शिक्षा सुनावली आहे. सदर खटल्यामध्ये सरकारी वकील कमलाकर शंकरराव नवले यांना कोर्ट पैरवी पी. एस. आय. गोरख कसपटे,पोलीस निरीक्षक नारायण देशमुख तसेच पोलीस हवालदार वेनुनाद ढोपरे यांनी
सहकार्य केले. तसेच सरकारी अभियोक्ता कार्यालय येथील क्लार्क सुनिता सतिश कांबळे / भालके यांनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment