भीम जयंती महोत्सव दौंड 2026 अध्यक्षपदी शशांक गायकवाड तसेच उपाध्यक्षपदी दिगंबर रिकीबे यांची निवड... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 25, 2026

भीम जयंती महोत्सव दौंड 2026 अध्यक्षपदी शशांक गायकवाड तसेच उपाध्यक्षपदी दिगंबर रिकीबे यांची निवड...

भीम जयंती महोत्सव दौंड 2026 अध्यक्षपदी शशांक गायकवाड तसेच उपाध्यक्षपदी दिगंबर रिकीबे यांची निवड...
पुणे:- महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर  व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती महोत्सव बैठकीचे आयोजन RPI (A) राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी यांच्या मार्गदर्शनात व पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ खरात यांच्या नेतृत्वात करण्यात आले यावेळी 10 एप्रिल 2026 रोजी भव्य रक्तदान शिबिर, 11 एप्रिल 2026 रोजी 135 विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप, तसेच 12 एप्रिल 2026 रोजी जल्लोष भीम गीतांचा प्रसिद्ध गायिका भीम कन्या भाग्यश्री ताई इंगळे यांचा भीमगीतांचा लाईव्ह कॉन्सर्ट प्रबोधन मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) दौंड शहर व तालुका च्या वतीने सर्वांनुमते अध्यक्षपदी शशांक गायकवाड तसेच उपाध्यक्षपदी दिगंबर रिकीबे यांची निवड करण्यात आली त्या समयी पक्षाचे दौंड शहर व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment