बारामतीच्या शासकीय रुग्णालयाचा बोगस शिक्का, बोगस सर्टिफिकेट..गैरवापर झाल्याने डॉक्टरवर गुन्हा दाखल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 24, 2026

बारामतीच्या शासकीय रुग्णालयाचा बोगस शिक्का, बोगस सर्टिफिकेट..गैरवापर झाल्याने डॉक्टरवर गुन्हा दाखल..

बारामतीच्या शासकीय रुग्णालयाचा बोगस शिक्का, बोगस सर्टिफिकेट..गैरवापर झाल्याने डॉक्टरवर गुन्हा दाखल..
बारामती:-बारामतीत नक्की चाललंय काय? बारामती शहरातील सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचा मुदत संपली असताना शिक्का वापरून स्वत:च्या रुग्णालयात उपचार घेतलेल्या जखमी व्यक्तीला बोगस शासकीय प्रमाणपत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डॉ.पांडुरंग संभाजी गावडे (वय ४७, गावडे हॉस्पिटल, गुणवडी रोड, बारामती) असं गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचं नाव आहे. याबाबत सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.महेश जगताप
यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश गावडे यांनी याबाबत सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाकडे पुराव्यानिशी तक्रार केली होती. त्यानुसार रुग्णालयाकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, १ एप्रिल २०१९ रोजी गुणवडी रस्त्यावरील गावडे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या जखमीला डॉ. पांडुरंग गावडे यांनी सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालयाच्या शिक्क्याचा वापर करून बनावट प्रमाणपत्र दिले. या प्रमाणपत्रावर 'Dr.
Pandurang Gawade, Medical Officer, SJ Hospital Baramati ' असा शासकीय पदाचा शिक्का वापरण्यात आला होता. याबाबत सतीश गावडे यांच्या तक्रारीनंतर झालेल्या चौकशीत डॉ.गावडे हे शासकीय सेवेत नसल्याचे स्पष्ट झाले.याबाबत न्यायालयातही खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्यात साक्ष देताना संबंधित सही व शिक्का स्वतःचाच असल्याचेही कबूल केल्याचे डॉ.गावडे यांनी कबूल केले होते. त्यामुळे शासनाच्या शिक्क्याचा वापर करून संबंधित प्रमाणपत्राला अधिकृतता प्राप्त झाल्याचा आभास निर्माण करत
दिशाभूल निर्माण केल्याचं डॉ. महेश जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानुसार बारामती शहर पोलिसांनी Bombay Nursing Homes Registration Act, 1949 मधील कलम १३, भारतीय दंड संहिता कलम ४१९ व ४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी करत आहेत.याबाबत सतीश गावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

No comments:

Post a Comment