बारामती (रामायण धर्माधिकारी):श्री भगवान महावीर स्वामी जन्म कल्याण निमित्त आभाळमाया सेवाभावी ग्रुप, बारामती यांच्या वतीने मुक्या प्राण्यांसाठी पाणी टँकरद्वारे फॉरेस्ट परिसर, मतिमंद आश्रम व गोशाळांमध्ये पानवटे भरण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमास जैन मुनि गच्छाधिपती जैनाचार्य श्रीमद् विजय युगभूषणसुरीश्वरजी महाराज (पंडित महाराज साहेब) यांचे तसेच साधु-साध्वींचे आशीर्वाद लाभले. यावेळी श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ, बारामतीचे चेअरमन मनोज मुथा, उपाध्यक्ष केवल मोता, सेक्रेटरी प्रताप दोषी, ट्रस्टी जयु मोदी, खजिनदार पी. टी. गांधी, ट्रस्टी मेहुल दोशी व जिगर ओसवाल उपस्थित होते.
तसेच नगराध्यक्ष सचिनशेठ सातव, नगरसेवक प्रसाद खारतुडे, पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी व अशोक राऊत यांनीही उपस्थिती दर्शवली. गोशाळेचे संस्थापक सुनीलभाई मेहता, मतिमंद आश्रम कऱ्हावागजच्या संस्थापक राज रामेश्वरी जाधव व फॉरेस्ट अधिकारी गोलांडे यांच्या उपस्थितीत पाणी टँकरचे शुभारंभ करण्यात आला.
No comments:
Post a Comment