तरुणीशी प्रेमाचं खोटं नाटक करत वारंवार शरीरसंबंध ठेवले; लग्नाचा विषय निघताच तुझे तसले फोटो घरच्यांना दाखवेल अशी मिळत होती धमकी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, April 2, 2026

तरुणीशी प्रेमाचं खोटं नाटक करत वारंवार शरीरसंबंध ठेवले; लग्नाचा विषय निघताच तुझे तसले फोटो घरच्यांना दाखवेल अशी मिळत होती धमकी..

तरुणीशी प्रेमाचं खोटं नाटक करत वारंवार शरीरसंबंध ठेवले; लग्नाचा विषय निघताच तुझे तसले फोटो घरच्यांना दाखवेल अशी मिळत होती धमकी..
पुणे:-लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्याची संख्या वाढत असून यामध्ये कोणी आर्थिक तर कुणी अनैतिक संबंध ठेवून ब्लॅकमेल करणं असे प्रकार सर्रास घडत असून नुकताच अशी एक घटना घडली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख करून घेत  एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. इतकंच नव्हे तर पैसे परत मागितल्यावर आरोपीने महिलेची बदनामी करण्यासाठी बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ नातेवाईकांना पाठवण्याची धमकी दिली.या प्रकरणी 37 वर्षीय महिलेने फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आर्यन ऊर्फ तनुराग संजय शर्मा (वय 32, रा. मोहाली, पंजाब) याच्याविरोधात
गुन्हा दाखल केला आहे. एप्रिल 2020 ते 1 फेब्रुवारी
2026 या कालावधीत हा प्रकार सुरू असल्याचे समोर
आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सोशल
मीडियावरून महिलेची ओळख करून घेत तिच्याशी
जवळीक वाढवली आणि लग्नाचे आश्वासन दिले.
विश्वासात घेतल्यानंतर त्याने तिच्यासोबत वारंवार शारीरिक
संबंध ठेवले. याच दरम्यान विविध कारणे सांगत त्याने
महिलेकडून तब्बल 2 लाख 10 हजार रुपये उकळले.
मात्र, महिलेला फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यानंतर
तिने पैसे परत मागितले असता आरोपीने उलट तिला
धमकावण्यास सुरुवात केली. तिच्या नावाने बनावट
इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करून अश्लील फोटो आणि
व्हिडिओ नातेवाईकांना पाठवून बदनामी करण्याचा प्रयत्न केला.या घटनेमुळे सोशल मीडियावरील ओळखी किती
धोकादायक ठरू शकतात, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक ढावरे
करत असून आरोपीचा शोध सुरू आहे. नागरिकांनी अशा
ऑनलाइन ओळखीत व भुलथापाना बळी पडू नका व सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment