बारामती बिनविरोध होणार का? मुख्यमंत्र्यांच्या आवाहाना नंतरही हे नेते उतरणार निवडणूक रिंगणात... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, April 5, 2026

बारामती बिनविरोध होणार का? मुख्यमंत्र्यांच्या आवाहाना नंतरही हे नेते उतरणार निवडणूक रिंगणात...

बारामती बिनविरोध होणार का? मुख्यमंत्र्यांच्या आवाहाना नंतरही हे नेते उतरणार निवडणूक रिंगणात...
बारामती :-गेल्या काही दिवसापासून बारामती बिनविरोध होईल अशी आशा काही जणांनी उमेदवारी अर्ज भरले असले तरी काँग्रेस व obc नेते लक्ष्मण हाके यांनी देखील उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगितलं आहे, याबाबत मिळालेली माहिती अशी की, सहा तारखेला उमेदवारी अर्ज दाखल होत असताना बारामती विधानसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत.
स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं आवाहन सर्वच पक्षांना आणि नेत्यांना केलं होतं.पण त्याला कुणी ही प्रतिसाद देत नसल्याचं चिन्ह सध्या तरी पाहायला मिळत आहे. फडणवीसांनी आवाहन
केल्यानंतर ही ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ही
निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. ही निवडणूक सहानुभूतीच्या लाटेवर होत आहे असं ते म्हणाले. याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. या सरकारकडून आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत. आमचे आरक्षण गेले आहे.याबाबत आम्ही प्रचंड नाराज आहोत. त्यात निवडणूक न होणं लोकशाहीला मारक आहे, असं सांगत त्यांनी
निवडणूक लढवण्याचं स्पष्ट केलं आहे.ही निवडणूक अपक्ष लढणार की कोणत्या पक्षाकडून लढणार हे मात्र हाके यांनी स्पष्ट केलेलं नाही. ते म्हणाले याबाबत राष्ट्रीय पक्षाशी संपर्क झाला आहे. त्याचा निर्णय दोन दिवसात पक्का होईल. ही निवडणूक आपण अतिशय ताकतीने लढवणार आहोत. यात आपल्याला काही राष्ट्रीय
पक्षांचा पाठिंबा मिळणार आहे असं ही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे बारामतीचा तिढा सुटण्या ऐवजी आणखी वाढत जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मागील एक दोन वर्षापासून गाव गाड्यात आम्ही किती वेळा गेलो,
बारामतीकरांच्या समस्या आम्हा सारख्या चळवळीच्या कार्यकर्त्यांना चांगल्या माहित आहेत.आम्ही बारामतीकरांना कन्व्हेन्स करू. त्यांच्याकडून मतदान रुपी दान मागू असं ही हाके यावेळी म्हणाले, हाके पुढे म्हणाले आम्हाला कल्पना आहे की आम्ही ग्रामपंचायतीचे साधे सदस्यही नाही. मात्र आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाचे वारे प्यालो आहोत असं ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी जे आवाहन केलं त्याबाबत ही ते
म्हणाले आमने सामने चर्चा होईल त्यावेळी पाहू. आमच्या प्रश्नाबाबत काय होईल याची चिंता आम्हाला आहे. मात्र सध्या वेळ खूप कमी आहे असं म्हणत निवडणूक लढण्यावर आपण ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं.ओबीसींसाठी ही निवडणूक महत्वाची आहे. आम्हाला लढायचं मान्य आहे. आम्ही चळवळीतील माणसं आहोत.
आम्हाला संविधान व लोकशाहीचा सन्मान करणे माहिती आहे असं ही ते म्हणाले.या निवडणुकीचे वातावरण भावनिक आहे असं ही ते म्हणाले. या निवडणुकीत शरद पवार उद्धव ठाकरे एकत्र
येत आहेत. यावर ही त्यांनी प्रतिक्रीया दिली आहे. शरद पवार उद्धव ठाकरे खूप मोठे नेते आहेत. आम्ही चळवळीचे कार्यकर्ते आहोत. त्यांनी कोणाला पाठिंबा द्यावा हा त्यांचा प्रश्न आहे असं ते म्हणाले. ही निवडणूक आपण लढणार हे
त्यांनी सांगितलं. मात्र राष्ट्रीय पक्षांच्या आपण संपर्कात आहोत. काही वेळ आम्हाला द्या काही तासात तुम्हाला चित्र स्पष्ट होईल की कोणत्या पक्षाकडून आपण निवडणूक लढणार आहोत ते असं ही त्यांनी सांगितलं. त्यामुळे हाके कोणाचे उमेदवार असणार हे काही वेळात स्पष्ट होणार
असले तरी सहा तारखेला याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.

No comments:

Post a Comment