बारामती पोटनिवडणूक मध्ये काँग्रेस सहा तारखेला दाखल करणार अर्ज; आकाश मोरे किंवा रोहित बनकर यांच्यात रस्सी खेच..
बारामती :- कॉग्रेस ने जाहीर केल्या प्रमाणे सहा एप्रिल रोजी संपूर्ण राज्याचे लक्ष लागून
असलेल्या बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून रोहित बनकर, डॉ. विजयकुमार भिसे आणि आकाश मोरे यांच्या नावाची चर्चा असून आकाश मोरे किंवा रोहित बनकर यांच्या नावासाठी वरिष्ठ पातळीवर शिफारसी होत असल्याचे कळतंय या निवडणुकीसाठी आज संध्याकाळपर्यंत दिल्लीतून नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात धनगर
समाजाचा चेहार देण्याची तयारी करत आहेत.
बारामतीमध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणात असल्याने या निवडणुकीसाठी आकाश मोरे यांना काँग्रेसकडून संधी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. तर माळी समाजातुन रोहित बनकर असल्याने कुणाची वर्णी लागतीय हे कळेलच तर मविआतील घटक पक्षाने कोणतीही भूमिका
घेतली तरी काँग्रेस भूमिकेवर ठाम राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
तर दुसरीकडे या निवडणुकीसाठी बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांच्यासह आतापर्यंत 19 उमेदवारांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे,नुकताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सर्व राजकीय पक्षांनी सुनेत्रा
पवार यांना पाठिंबा जाहीर करावा असा आवाहन
केलेल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार का?obc नेते लक्ष्मण हाके यांनी देखील ही निवडणूक लढवीणारच असे ठामपणे सांगितले याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.बारामती पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत दाखल अर्ज
अभिजीत बिचुकले ( अपक्ष ),सागर भिसे ( अपक्ष ),सतिश कदम ( हिंदुस्तान जनता पार्टी ),राघू घटुकडे ( न्यू राष्ट्रीय समाज पार्टी ),त्रिशाला कांबळे ( अपक्ष ),गजानन गवळी ( अपक्ष ),दत्तात्रेय बेदरे ( अपक्ष ),रजाक मुलाणी ( अपक्ष ),दिलीप अळोणी ( अपक्ष ),विलास होळकर ( अपक्ष),अरूण निटुरे ( राष्ट्रीय किसान बहूजन पार्टी ),अभिजीत कांबळे (अपक्ष),दादा थोरात (अपक्ष),संदीप खरात ( अपक्ष ),मिथून आटोळे (अपक्ष),अनिल तुपे ( अपक्ष ),संकेत गावडे (अपक्ष)या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले असून अनेकांनी उमेदवारी फॉर्म नेले असले तरी सहा तारखेला कळेल किती जण उमेदवारी अर्ज भरतील.
No comments:
Post a Comment