शासकीय कामात अडथळा आणल्याबददल आरोपीस २ वर्षे सक्त मजुरी ५,००० रूपये दंड.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, April 11, 2026

शासकीय कामात अडथळा आणल्याबददल आरोपीस २ वर्षे सक्त मजुरी ५,००० रूपये दंड..

शासकीय कामात अडथळा आणल्याबददल आरोपीस २ वर्षे सक्त मजुरी ५,००० रूपये दंड..
बारामती :- दिनांक १०/०४/२०२६ रोजी बारामती येथील मे. जिल्हा न्यायाधीश मा. एच. ए. वाणी साो, यांनी आरोपी नाव यशवंत उर्फ रामा पोपट भागवत, रा. पाटस,तालुका दौंड, जिल्हा पुणे. यास शासकीय कामात अडथळा आणल्याबददल २ वर्षे सश्रम कारावासाची व ५००० /- रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना सक्त कारावास अशी शिक्षा मा. न्यायालयाने सुनावली आहे.थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक १४/०८/२०१९ रोजी सकाळी १०.००
वाजता आरोपी यांनी फिर्यादी श्री. राजेंद्र निवृत्ती म्हस्के मंडळ अधिकारी हे पाटस येथील मंडळ अधिकारी कार्यालय येथे काम करत असताना आरोपी तेथे आला व म्हणाला की, माझ्या विरूध्द पार्टीची नोंद मंजुर का केली त्यावरती मंडळ अधिकारी यांनी वरिष्ठणांकडे अपिल करण्याची मुदत संपली असल्याने नोंद केली आहे असे
म्हटले असता आरोपी यांनी शिवीगाळ व दमदाटी करूण मंडळ अधिकारी यांची गचोटी धरूण धक्काबुक्की केली अशी धमकी देत सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल यवत पोलीस स्टेशनला गु.र.नं ७०९ / २०१९ अन्वये फिर्यादी यांनी फिर्याद दाखल केली सदरील गुन्हयाचा तपास तात्कालीन पोलीस उपनिरीक्षक आर. एन. घाडगे यांनी तपास करुन कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते.सदरील केसमध्ये फिर्यादी पक्षातर्फे फिर्यादी, पंच, तपासी अधिकारी यांच्या
साक्ष नोंदवण्यात आली. सदरील केसमध्ये सरकार पक्षातर्फे अति. सरकारी अभियोक्ता श्री. विकास घनवट यांनी काम पाहिले. केसमध्ये अति सरकारी अभियोक्ता यांचा युक्तीवाद में न्यायालयाने ग्राहय धरुन शासकीय कामात अडथळा आणल्याबददल भा. द. वी. कलम ३५३ यांस २ वर्षे सश्रम कारावासाची व ५००० /- रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना सक्त कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. सदर प्रकरणी प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नारायण देशमुख व पी. एस. आय. श्री. जी. कसपटे, ए. एस. आय. श्री कवडे, पी. आय.श्री. संतोष पोळवे यांनी तसेच त्यास पोलीस हवालदार श्री. व्ही. टी. ढोपरे यांनी मोलाचे सहकार्य केले.

No comments:

Post a Comment