बारामती(रामायण धर्माधिकारी ):-जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्ताने तहसील कार्यालय व अखिल भारतीय ग्राहक पंचायत,बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (१० एप्रिल) रोजी अँग्रीकलचर डेव्हलपमेंट ट्रस्ट शारदानगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती बारामती गटविकास अधिकारी किशोर माने, अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्हाध्यक्ष ॲड. तुषार झेंडे पाटील,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत बारामती तालुका अध्यक्ष संजीव बोराटे, बारामती तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी तितिक्षा बारापात्रे यांच्यासह अखिल भारतीय ग्राहक पंचायत, ग्राहक संरक्षण परिषदेचे पदाधिकारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
ॲड. झेंडे पाटील म्हणाले, ‘ग्राहक संरक्षण कायद्याची पार्श्वभूमी, अंमलबजावणी तसेच राष्ट्रीय ग्राहक मंच तक्रार प्रणाली आणि ई-कॉमर्स प्रणाली खरेदी करतांना फसवणूक झाल्यास ग्राहकांना तक्रार करण्याविषयी मार्गदर्शन केले. ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या फसवणूकी पासून सर्वांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले.
श्रीमती बारापत्रे यांनी ग्राहकांच्या हक्कांच्या सोबतच विक्रेत्यांचे कर्तव्याबाबत मार्गदर्शन केले. श्री. दिलावर तांबोळी यांनीही मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment