बारामतीत हातभट्टी दारूविरोधात पोलिसांची अवैध धंद्यांवर कारवाई..!उत्पादन शुल्क विभागाने केली होती डोळेझाक.
बारामती :- बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध हातभट्टी दारू व्यवसायावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी व्यापक, नियोजनबद्ध व प्रभावी मोहीम राबवून सलग धडक कारवाया केल्या आहेत. या कठोर कारवाईमुळे दारू विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून परिसरात कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट झाली आहे.
पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली गुप्त माहितीच्या आधारे गुणवडी, बांदलवाडी, आमराई व परिसरात एकाचवेळी छापेमारी करण्यात आली.
या कारवाईदरम्यान
गावठी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे ड्रम, भांडी व इतर साहित्य जप्त
मोठ्या प्रमाणावर तयार दारू हस्तगत
जप्त साहित्य व दारू जागीच नष्ट त्यामुळे अवैध व्यवसायावर तात्काळ व प्रभावी आळा बसला आहे.
पायी पेट्रोलिंगद्वारे व्यापक मोहीम
गेल्या चार दिवसांत पोलिसांनी खालील भागात पायी पेट्रोलिंग करून मोठी कारवाई केली.
गुणवडी, बांदलवाडी, आमराई, पिंपळी, लिमटेक, कसबा, साठेनगर या कारवाईत घरगुती भट्ट्यांचा नायनाट, दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारी साधने नष्ट करण्यात येऊन अवैध साठ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात आली.
पोलीसांनी केवळ कारवाईच नव्हे तर सामाजिक बांधिलकीही जपली आहे. गावोगावी जनजागृती मोहीम
महिला वर्गाशी थेट संवाद
दारूबंदी कायद्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अवैध दारूमुळे होणारे आरोग्य व सामाजिक दुष्परिणाम स्पष्ट करण्यात आले.
परंपरागत दारू व्यवसाय करणाऱ्या महिलांचे समुपदेशन करून त्यांना पर्यायी उपजीविकेकडे वळण्याचे आवाहन करण्यात आले.
पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी स्पष्ट इशारा दिला आहे.
“अवैध दारू विक्री विरोधातील मोहीम सातत्याने सुरू राहील.
कोणताही बेकायदेशीर व्यवसाय आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे.”
स्थानिकांकडून समाधान व्यक्त या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, अवैध धंद्यांना आळा बसेल.
कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होईल
अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
सदर कारवाई ही
पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार
पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार
पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, PSI भंडारे, पो.हवा. यशवंत पवार, रामचंद्र शिंदे, अभिजीत कांबळे, एएसआय संदीप जाधव, महिला पो.शि. सीमा निंबाळकर, राजश्री जगताप, पो.शि. अमोल देवकाते, अक्षय सिताफ, विशाल शिंदे, विजय ओमासे इत्यादी असून कारवाई करण्यात आली आहे.
“अवैध दारू म्हणजे आरोग्य व समाजासाठी गंभीर धोका!” आपल्या परिसरात संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित बारामती शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.
प्रभारी पोलीस निरीक्षक
बारामती शहर पोलीस स्टेशन
No comments:
Post a Comment