महसूल विभागातर्फे "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान" आयोजित.. बारामती(रामायण धर्माधिकारी):- दिनांक १४/०५/२०२६ रोजी मौजे बऱ्हाणपूर येथे मंडल उंडवडी क.प. मंडल स्तरावर महसूल विभागातर्फे आयोजित "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान" सकाळी
१० ते सायंकाळी ०५ वाजेपर्यंत राबविण्यात आले. महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबधित दैनंदिनी प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करणेसाठी मंडल स्तरावर समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये
महसूल विभाग, भूमी अभिलेख विभाग, पुरवठा विभाग, ग्रामविकास विभाग, आरोग्य विभाग,
सामाजिक सहाय्य योजना विभाग, कृषि विभाग, पोस्ट ऑफिस विभाग, आधार कार्ड केंद्र, CSC व
महाईसेवा केंद्र इत्यादी विभागांच्या सेवांच्या लाभ वितरण व अर्ज स्वीकृतीचे नियोजन करण्यात आले होते.सदर शिबिर मा. उपविभागीय अधिकारी बारामती श्री. उत्तम दिघे यांचे मार्गदर्शनाखाली पार पडले. सदर शिबिरामध्ये प्रशासनातर्फे मा. तहसीलदार सो. श्री स्वप्निल रावडे, सौ. स्वाती गायकवाड महसूल नायब तहसीलदार, पुरवठा विभागातील इतर कर्मचारी, श्री. अशपाक इनामदार मंडल अधिकारी,
उंडवडी क.प.मंडळातील सजाचे ग्राम महसूल अधिकारी प्रविण भगत, नितीन किर्दक दत्तात्रय तळवार,अश्विनी मारणे, सविता महानवर, अक्षदा नेवसे, संजय शिंदे कृषी विभागातील जी.डी. वाघमारे मंडल कृषी अधिकारी उंडवडी सुपे व श्री किसन काझडे उप कृषी अधिकारी उंडवडी सुपे, तसेच कृषी सहाय्यक अधिकारी संगीता गावडे, अदिती पवार, मयूर गोफणे, राहुल भोसले तसेच ग्राम विकास अधिकारी सोमनाथ थोरात, मिनाज
मुलाणी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. श्री. बाळासाहेब चांदगुडे सरपंच बऱ्हाणपूर, तसेच. मेडद, नेपतवळण, अंजनगाव, कन्हावागज, उंडवडीक. प. सोनवडीसुपे, सावंतवाडी, गोजुबावी, तांदुळ
वाडी, जळगाव सुपे ग्रामपंचायत सदस्य व उंडवडी क.प मंडलातून सर्व ११ गावातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर, ग्रामस्थ व विविध योजनांचे लाभार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
शिबिराची सुरुवात उपस्थित मान्यवर व नागरिकांच्या तर्फे महाराष्ट्र राज्याचे दिवंगत
उपमुख्यमंत्री स्वर्गीय मा. अजितदादा पवार साहेब यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.त्यानंतर श्री.अशपाक इनामदार मंडल अधिकारी शिर्सुफळ यांनी प्रास्ताविक केले. त्यामध्ये महसूल विभागातर्फे प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे ७/१२ अभिलेख दुरुस्ती, अकृषक तरतुदी सुधारणा, कमी जास्त
पत्रके तयार करणे, पाणंद रस्ते विषयक माहिती, ई मोजणी अर्ज, जिवंत ७/१२ अंतर्गतच्या नोंदीविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच विविध विभागातर्फे आयोजित योजना तसेच पुरविण्यात येणाऱ्या सेवांविषयी मार्गदर्शन केले. व नागरिकांना येणाऱ्या विविध समस्यांची सोडवणूक शिबिरस्तरावर करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर विविध विभागांच्या मार्फत लाभांचे वाटप मा. नायब तहसीलदार गायकवाड मॅडम व
उपस्थित इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर शिबिरामध्ये दाखले, प्रमाणपत्रे, व विविध
विभागांचे लाभार्थ्याना लाभ वाटप तसेच अर्ज स्वीकृती करण्यात आले. शिबिरा दरम्यान ३११ लाभार्थी यांना लाभ देण्यात आला. त्यानंतर आभार प्रदर्शन करण्यात आले. शिबिरात संपूर्ण दिवसभर नागरिकांनी विविध विभागांकडे अर्ज दाखल करणे, योजनांची माहिती घेणे इत्यादी. कार्यवाही केली. सदर शिविर यशस्वीरित्या पार पाडण्यात मा. उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, मा. तहसीलदार रावडे व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे तसेच विविध विभागाचे अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment