मला शरीरसुख दे,नाही तर त्याला जेलमध्येच सडवतो, महिलेला धमकी,गुन्हा दाखल. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, May 28, 2026

मला शरीरसुख दे,नाही तर त्याला जेलमध्येच सडवतो, महिलेला धमकी,गुन्हा दाखल.

मला शरीरसुख दे,नाही तर त्याला जेलमध्येच सडवतो, महिलेला धमकी,गुन्हा दाखल.
 हवेली:-छेडछाड प्रकरणी अटकेत असलेल्या दिरासाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणारा अटक, याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिची छेडछाड केल्याप्रकरणी येरावडा कारागृहात सजा भोगत असलेल्या दिराची सुटका करायची असेल तर मला शरीरसुख दे,नाहीतर त्याला जेल मध्ये सडवतो.अशी धमकी देऊन महिलेला शिवीगाळ करणाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ३२ वर्षांच्या पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून कैलास दौलत सावंत (रा.
चव्हाण वस्ती, थेऊर ता. हवेली) यांच्यावर लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
पीडिता १६ मे रोजी रात्री नेहमीप्रमाणे घराच्या पाठीमागे येथे शौचास जात होती. त्यावेळी रस्त्यामध्ये तिच्या ओळखीचा कैलास सावंत हा तेथे आला. “तुझ्या दिराची सुटका करायची असेल तर शरीरसुखाची मागणी केली.
तिने त्यास शिव्या दिल्या. तेथून ती घरी निघून आली. ती घाबरल्याने तिने कोणास काही सांगितले नाही. त्यानंतर(दि. २०) रोजी याची पुनरावृत्ती झाली.त्यानंतर २२ मे रोजी रात्री पुन्हा सावंत याने तिला माळरानामध्ये गाठून तिचा हात पकडला. तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. त्याने हात पकडल्याने तिला राग आला. त्यामुळे पीडितेने त्याला शिवीगाळ केली. त्यावेळी
आरोपीने तिला धमकी दिली. त्यानंतर पिडीताने सासू-सासरे व नणंदेला सर्व हकीकत सांगितली. त्यामुळे तिला धीर दिल्याने तिने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पोलीस तपास करीत आहे.

No comments:

Post a Comment