बारामती नगरपरिषदेमार्फत जनगणना 2027 कामास प्रारंभ - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, May 29, 2026

बारामती नगरपरिषदेमार्फत जनगणना 2027 कामास प्रारंभ


बारामती नगरपरिषदेमार्फत जनगणना 2027 कामास प्रारंभ
बारामती (रामायण धर्माधिकारी):- बारामती शहरामध्ये भारत सरकारच्या जनगणना 2027 अभियानांतर्गत कामकाजास सुरुवात करण्यात आली असून पहिल्या टप्प्यातील घरयादी तयार करण्याची कार्यवाही दिनांक 15 जून 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

या अनुषंगाने आज बारामती नगरपरिषद कार्यालय येथे प्रगणक श्री. किशोर भोसले यांनी पर्यवेक्षक श्री. अरुण थोरात यांच्या समवेत नगरपरिषदेची घरगणना केली. यावेळी बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. पंकज भुसे, जनगणना नोडल अधिकारी श्री. गौरव दुरुगकर तसेच तांत्रिक सहाय्यक श्री. राहुल चव्हाण उपस्थित होते.

सदर जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी श्री. पंकज भुसे यांनी नागरिकांनी अचूक माहिती देऊन जनगणना कार्यास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

जनगणना ही देशाच्या विकास नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून नागरिकांच्या सहकार्यामुळे हे काम अधिक प्रभावीपणे पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment