'आता सहन होईना,मला माफ कर,तू माझ्यासाठी भरपूर केलंस,पण..' नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन सावकार करीत होता 25 लाखांची मागणी,अखेर सावकारी छळाला कंटाळून पतीनं घेतला विषाचा घोट.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, September 27, 2026

'आता सहन होईना,मला माफ कर,तू माझ्यासाठी भरपूर केलंस,पण..' नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन सावकार करीत होता 25 लाखांची मागणी,अखेर सावकारी छळाला कंटाळून पतीनं घेतला विषाचा घोट..

'आता सहन होईना,मला माफ कर,तू माझ्यासाठी भरपूर केलंस,पण..' नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन सावकार करीत होता 25 लाखांची मागणी,अखेर सावकारी छळाला कंटाळून पतीनं घेतला विषाचा घोट..
कागल :- खासगी सावकाराकडून 9 लाख रुपये घेतल्यानंतर बदल्यात 26 लाख परत
करूनही पुन्हा नव्याने 25 लाखांची मागणी केल्याने त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सोनगेमधील घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. श्रीधर दत्तात्रय डावरे (वय 48 वर्षे, रा. सोनगे, ता. कागल, जि. कोल्हापूर) डावरे (वय 48 वर्षे, रा. सोनगे, ता. कागल, जि. कोल्हापूर)असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पत्नी सविता श्रीधर डावरे यांनी आरोपी निवास आप्पासो पाटील (रा. बामणे, ता.कागल, जि. कोल्हापूर) याच्याविरोधात मुरगूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पण मी काही करु शकलो नाही मला माफ कर दरम्यान, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी निवास पाटील हा खासगी सावकारी करतो. श्रीधर डावरे यांनी आरोपीकडून व्याजाने ₹9 लाख रुपये घेतले होते. या रकमेपोटी मयत श्रीधर डावरे यांनी आरोपीला आतापर्यंत ₹26 लाख रुपये परत केले होते. तरीही आरोपी मयताकडे
आणखी ₹25 लाख रुपयांची मागणी करत होता व त्यावरून त्यांना मारहाण व धमक्या देत होता. या त्रासाला व मानसिक तणावाला कंटाळून बुधवारी (23 सप्टेंबर)श्रीधर डावरे पत्नीला अत्यंत भावनिक मेसेज पाठवला."सविता तू माझ्या साठी भरपूर केलस पण मी काही करु शकलो नाही मला माफ कर मी माझ्या समू जवळ जातो तू शंभोला फुलासारखं सांभाळ." त्यांनी मेसेज पाठवत "माझ्या खिशात चिट्टी ठेवली आहे, मला आता सहन होईना झालं." असा उल्लेख केला आहे.मेसेजसोबत खिशात ठेवलेल्या चिठ्ठीचे दोन फोटो पाठवून श्रीधर डावरे यांनी विषारी तणनाशक प्राशन केले. त्यांना उपचारासाठी प्रथम निपाणी येथील डॉ. अरुण पाटील यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटलला हलवण्यात आले.उपचारादरम्यान काल (26 सप्टेंबर) रोजी त्यांचा मृत्यू झाला. आरोपीने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने पत्नी सविता डावरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास चालू आहे.

No comments:

Post a Comment