बानपच्या शालेय गणवेशाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह करत केला आरोप;चौकशीची मागणी..
बारामती नगरपालिकेच्या शालेय गणवेश खरेदी प्रक्रियेवरून आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात
झाली असून, विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या गणवेशाच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.नगरपालिकेने नियम व शासकीय निकष धाब्यावर बसवून
ठेकेदारांना सांभाळण्याचा प्रताप सुरू केल्याचा आरोप नगरपालिकेच्या गटनेत्या आरती
शेंडगे यांनी पत्रकारांना सांगितले .शालेय गणवेशाच्या निविदा प्रक्रियेत नियमांचे पालन
करण्यात आले का, तसेच विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गणवेशाचा दर्जा आवश्यक निकषांनुसार आहे का, याची
चौकशी करण्याची मागणी शेंडगे
यांनी केली. निविदा प्रक्रिया राबविताना शासकीय नियमांकडे दुर्लक्ष करून मनमानी पद्धतीने
गणवेश खरेदी व वाटप करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.नगरपालिकेच्या शाळांमध्ये
खरेदी करण्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
आलेल्या असता,गणवेशाचा प्रत्यक्ष दर्जा तपासला त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पॉलिस्टरचा वापर वापरासाठी असल्याचे आढळून आल्याचा
दावा शेंडगे यांनी केला.विद्यार्थ्यांच्या देण्यात येणाऱ्या गणवेशाच्या कापडाची गुणवत्ता, त्यातील घटक, टिकाऊपणा तसेच विद्यार्थ्यांच्या
आरोग्याच्या दृष्टीने त्याची उपयुक्तता याबाबत प्रशासनाने पारदर्शक माहिती देणे आवश्यक
असल्याचे त्यांनी म्हटले.गणवेश हा विद्यार्थ्यांच्या
मूलभूत गरजेशी संबंधित विषय आहे. अशा खरेदीमध्ये केवळ निविदा काढणे आणि गणवेश
वाटप करणे पुरेसे नसून,खरेदी केलेल्या साहित्याचा दर्जा आणि त्यासाठी खर्च करण्यात आलेल्या सार्वजनिक निधीचा योग्य विनियोग झाला आहे का, हेही महत्त्वाचे आहे, अशी भूमिका पत्रकार परिषद मध्ये विरोधी नेते सौ. आरती(गव्हाळे)शेंडगे यांनी मांडली.
No comments:
Post a Comment