*अजितदादांचे माळेगाव कारखान्याला देशात अग्रस्थानी नेण्याचे स्वप्न पूर्ण करू : उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, September 28, 2026

*अजितदादांचे माळेगाव कारखान्याला देशात अग्रस्थानी नेण्याचे स्वप्न पूर्ण करू : उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार*

*अजितदादांचे माळेगाव कारखान्याला देशात अग्रस्थानी नेण्याचे स्वप्न पूर्ण करू : उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार*

*सभासदांच्या प्रत्येक सूचनेची सकारात्मक दखल; कारखान्यात काटकसरीला प्राधान्य देणार : सुनेत्रावहिनी*


*माळेगाव कारखाना देशात अग्रस्थानी नेण्याचे अजितदादांचे स्वप्न पूर्ण करू; सभासदांच्या सूचनांची सकारात्मक दखल घेऊन कारभारात काटकसरीला प्राधान्य – उपमुख्यमंत्री तथा चेअरमन सुनेत्रावहिनी अजितदादा पवार*


बारामती(रामायण धर्माधिकारी): माळेगाव सहकारी साखर कारखान्याची ७१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उपमुख्यमंत्री तथा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी त्यांनी कारखान्याच्या प्रगतीसाठी सभासदांनी व्यक्त केलेल्या विविध सूचना व मतांची सकारात्मक दखल घेत, कारखान्याचा कारभार अधिक सक्षमपणे पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी बोलताना सुनेत्रावहिनी अजितदादा पवार म्हणाल्या, “स्वर्गीय अजितदादांच्या निधनानंतर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची जबाबदारी माझ्यावर आली. हा कारखाना केवळ एक सहकारी संस्था नसून ही एक लोकचळवळ आहे. आदरणीय अजितदादांना अनेक सहकारी साखर कारखान्यांच्या कारभाराचा प्रदीर्घ अनुभव होता. त्यांना कोणत्याही कारखान्याचे चेअरमन होण्याची आवश्यकता नव्हती. मात्र, माळेगाव कारखाना काहीसा मागे पडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी या कारखान्याची जबाबदारी स्वीकारली. हा कारखाना देशात क्रमांक एकवर नेण्याचे त्यांचे स्वप्न होते.”


“अजितदादांचे हे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करून माळेगाव कारखाना देशातील अग्रगण्य कारखान्यांमध्ये नेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करायचे आहे. अजितदादांनी दाखवलेल्या विकासाच्या वाटेवरूनच आपण पुढे जाणार आहोत,” असेही त्यांनी सांगितले.


सभासदांनी सभेमध्ये मांडलेल्या विविध मुद्द्यांबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “सर्व सभासदांनी व्यक्त केलेल्या मतांची मी सकारात्मक दखल घेतली आहे. यावर्षी आपण गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत उच्चांकी भाव दिला आहे. त्यामुळे माझ्या शेतकरी बांधवांनी नाराज होण्याचे कारण नाही. पुढील वर्षीही शेतकऱ्यांना उच्चांकी भाव देण्यासाठी प्रयत्न केले जातील.”


यंदाच्या दुष्काळसदृश्य परिस्थितीचा उल्लेख करताना सुनेत्रावहिनी म्हणाल्या, “हे वर्ष दुष्काळाचे आहे, याची जाणीव आपल्या सर्वांना आहे. बारामती तालुक्यातही दुष्काळ जाहीर झाला आहे. अशा संघर्षाच्या काळात आपली एकजूट अत्यंत महत्त्वाची आहे. दुष्काळसदृश्य परिस्थितीत शेतकऱ्यांनी पाण्याचा जपून वापर करणे आवश्यक आहे.”


तसेच ऊस वाहतूक संघटनेच्या अडचणींबाबतही योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. “ऊस वाहतूक संघटनेच्या योग्य त्या अडचणी लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. कारखाना आणि शेतकरी हितासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा आपला प्रयत्न राहील,” असे त्यांनी सांगितले.


शेवटी शेतकऱ्यांना विश्वास देताना सुनेत्रावहिनी म्हणाल्या, “माळेगाव सहकारी साखर कारखान्याची चेअरमन म्हणून मी आपल्या पाठीशी कायम राहीन, हा शब्द मी आपल्या सर्वांना देते. आदरणीय अजितदादांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण त्यांच्या विचारांनी आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून एकजुटीने पुढे जाऊया.”

No comments:

Post a Comment