डाॅ.आकाश कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर;मूकबधिर विद्यार्थ्यांना फळे-खाऊ वाटप; शालेय साहित्य वितरणासह विविध ठिकाणी वृक्षारोपण... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 8, 2026

डाॅ.आकाश कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर;मूकबधिर विद्यार्थ्यांना फळे-खाऊ वाटप; शालेय साहित्य वितरणासह विविध ठिकाणी वृक्षारोपण...

डाॅ.आकाश कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर;मूकबधिर विद्यार्थ्यांना फळे-खाऊ वाटप; शालेय साहित्य वितरणासह विविध ठिकाणी वृक्षारोपण...
इंदापूर :- भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा महामंत्री डाॅ. आकाश कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाढदिवसाचा आनंद समाजातील विविध घटकांसोबत साजरा करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
इंदापूर येथील मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त फळे व खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवित सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.

त्यानंतर रूई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस प्रोत्साहन देण्यात आले. यावेळी शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला.

यानंतर रूई येथील प्रसिद्ध देवस्थान बाबीर बुवा परिसरातील ऑक्सिजन पार्कमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याची गरज असून, प्रत्येकाने वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

वाढदिवसाच्या निमित्ताने करण्यात आलेल्या या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे डाॅ. आकाश कांबळे यांचा वाढदिवस आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शुभेच्छा, सत्कार आणि औपचारिक कार्यक्रमांऐवजी विद्यार्थ्यांना मदत व वृक्षारोपणाला प्राधान्य देण्यात आल्याने या उपक्रमांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

या कार्यक्रमास पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण भैया माने, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सदानंद अण्णा शिरदाळे, माऊली काका चवरे, शहराध्यक्ष किरण गाणबोटे तालुकाध्यक्ष राजकुमार जठार, रामभाऊ आसबे, आबासाहेब थोरात, तानाजी मारकड, प्रवीणकुमार शहा, लखन जगताप, दीपक साळुंखे, सचिन लावंड, धनंजय आडके, अविनाश मोहिते, सागर पवार, आनंद शेंडे, अशोक मारकड व शाळेचे मुख्याध्यापक मारकड सर, उन्हाळे सर, मुलानी सर,  भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment