*रुग्ण हक्क परिषदेच्या पुण्यासह महाराष्ट्रातील सर्व कमिट्या बरखास्त;२४ नोव्हेंबरला पुण्यात राज्यव्यापी निर्धार मेळावा; नव्या संघटनात्मक बांधणीची घोषणा
पुणे :- रुग्ण हक्क परिषदेच्या संघटनात्मक पुनर्रचनेचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्हा, तालुका आणि शहर कमिट्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व विद्यमान पदाधिकाऱ्यांची पदे रद्द करण्यात आली आहेत.
रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली येत्या २४ नोव्हेंबर २०२६ रोजी पुण्यात राज्यव्यापी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात पुण्यासह महाराष्ट्रातील सर्व जिल्हे, तालुके आणि शहरांमध्ये नव्या कमिट्यांची पुनर्रचना करण्यात येणार आहे.
रुग्णांचे हक्क, सन्मान आणि न्यायासाठीची चळवळ राज्यभर अधिक मजबूत व व्यापक करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
मेळाव्याचा तपशील :
- दिनांक : २४ नोव्हेंबर २०२६
- वेळ : सकाळी ११ वाजता
- स्थळ : उद्यान प्रसाद मंगल कार्यालय, एस. पी. कॉलेजजवळ, खजिना विहीर चौक, सदाशिव पेठ, पुणे.
महाराष्ट्रातील रुग्ण हक्क चळवळीच्या नव्या पर्वाची सुरुवात या निर्धार मेळाव्यातून होणार आहे.
No comments:
Post a Comment