२६ नोव्हेंबर "संविधान दिन"होणार साजरा - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, November 25, 2020

२६ नोव्हेंबर "संविधान दिन"होणार साजरा

२६ नोव्हेंबर "संविधान दिन"होणार साजरा..   फलटण:-दि. २६/११/२०२० रोजी भारतीय राज्य घटणेचे शिल्पकार भारतरत्न महामानव बोधी सत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारत देशाला २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान अर्पण करुन या भारत देशाला व भारतातील तमाम देश वासियांना समान नागरीक हक्क दिला जगण्याचा  आधिकार दिला ,मत मांडण्याचा, मत देण्याचा आधिकार दिला या संविधान दिनी फलटण शहरात सालाबाद प्रमाणे आपल्या महामानवाला आभिवादन करण्यासाठी सर्वांनी ठीक १० वाजता डॉ बाबा साहेब आंबेडकर चौकात शासकीय निम शासकीय आधिकारी यांनी उपस्थीत राहावे असे विनंती आव्हान संविधान समर्थन मोर्चा समिती फलटण यांनी केले २६ नोव्हेंबर 'संविधान दिन' साजरा करण्यात येणार आहे. मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधान प्रास्ताविकेचे वाचन करणार आहे. सदर कार्यक्रम हा शासनाने कोरोना महामारी संदर्भात सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन करून साजरा करण्यात येणार आहे.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती संविधान समर्थन मोर्चा समिती च्या वतीने माहिती देण्यात आली.

No comments:

Post a Comment