पोलीस बॉइज असोसिएशन बारामती कार्यकारिणीची निवड - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, December 5, 2020

पोलीस बॉइज असोसिएशन बारामती कार्यकारिणीची निवड

पोलीस बॉइज असोसिएशन बारामती कार्यकारिणीची निवड 
बारामती: दिनांक ३०/११/२०२० रोजी पोलीस बॉइजचे संस्थापक अध्यक्ष श्री.रवि ना. वैद्य यांच्यासह प्रदेशाध्यक्ष विकास सुसर तसेच सोलापूर जिल्हयाचे अध्यक्ष श्री.रोहित ओंबासे, पुणे कार्याध्यक्ष आरीफ शेख यांच्या मार्गदर्शनाने तसेच संजय ( नाना) दराडे अध्यक्ष बारामती शहर यांनी पुढील प्रमाणे पोलीस बॉइज असोसिएशनच्या बारामती शहर नियुक्ती पत्र देऊन अधिकृतरित्या निवड करण्यात आली. शुभम भंडारे शहर उपाध्यक्ष, अनिकेत वणवे सरचिटणीस, करण नवले सचिव, अॅड.मेघराज नालंदे, अॅड.ओंकार इंगुले विधी सल्लागार यावेळी त्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन पुढील कार्यास सुरवात करण्यास सांगितले. हि संघटना पोलीसांच्या मुलांना पोलीस भरतीतील ५% आरक्षण मिळावे व तसेच रनिंग मध्ये ५० सेकंद वाढवुन मिळावे यासारखे अनेक सामाजिक, राजकीय मुद्दे घेऊन संघटना पोलीस व पोलीस कुटूंबाच्या न्याय हक्कासाठी कार्य करत आहे. यावेळी वरील पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याबद्दल महिला प्रदेशाध्यक्ष विजयाताई बावदाने, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री. नितीनभाऊ
पाटील, महिला आघाडी सोलापूर जिल्हाध्यक्ष नमिता थिटे, कार्याध्यक्ष सिद्धार्थ जाधव, कोअर कमिटी सदस्य गोकुळ दाभाडे, निवड समितीचे धीरज पार्सेकर, सुशील मोरे, ज्ञानोबा धुमाळ, माणिक निमसेक,आदींनी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment