युवकाचे अनैतीक संबधाच्या संशयावरून मित्रांनी धारदार शस्त्राने दोन्ही हात, दोन्ही पाय व धडापासुन मुंडके तोडुन निर्घुण केला खुन - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 20, 2021

युवकाचे अनैतीक संबधाच्या संशयावरून मित्रांनी धारदार शस्त्राने दोन्ही हात, दोन्ही पाय व धडापासुन मुंडके तोडुन निर्घुण केला खुन

युवकाचे अनैतीक संबधाच्या संशयावरून मित्रांनी धारदार शस्त्राने दोन्ही हात, दोन्ही पाय व धडापासुन मुंडके तोडुन निर्घुण केला खुन                                                                              इंदापूर:-इंदापूर तालुक्यातील गणेशवाडी  येथील
भिमानदीवरील गारअकोले पुलाजवळील नदीपात्रात टाकळी (टेंभुर्णी) ता.माढा येथील 23 वर्षीय युवकाचे अनैतीक संबधाच्या संशयावरून त्याच्याच चार मित्रांनी धारदार शस्त्राने दोन्ही हात, दोन्ही पाय व धडापासुन मुंडके तोडुन निर्घुन खुन केल्याची घटना गणेशवाडी येथे घडली आहे.तर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मयताचे धडावेगळे केलेले दोन्ही हात,पाय व मुंडके गायब करून ( मतदेह) धड भीमानदीच्या पात्रात फेकुन दिल्याची घटना इंदापूर
पोलीसांच्या कार्यतत्परतेमुळे उघडकीस आली आहे. यातील दोन आरोपींना इंदापूर पोलीसांनी जेरबंद असुन याबाबतची फिर्याद
मृत युवकाची आई सौ.मंजुषा महादेव गोरवे (वय 51),रा. टाकळी (टेंभुणी), ता.माढा,
जि. सोलापूर यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.संजय महादेव गोरवे (वय 23) रा. टाकळी
(टेंभु्णी),ता.माढा, जि. सोलापूर असे निर्घुन
खुन झालेल्या युवकाचे नाव आहे.तर दादा कांबळे. रा.बावडा, लकी विजय भोसले,विकी उर्फ व्यंकटेश विजय भोसले व महेश
उर्फ शैलेश प्रभाकर सोनवणे अशी आरोपींची नावे असुन यापैकी विकी उर्फ व्यंकटेश भोसले व महेश उर्फ शैलेश सोनवणे या दोन आरोपींना इंदापूर पोलीसांनी दोन तासात अटक करून गुन्ह्याचा छडा लावण्यात यश मीळवले
आहे. फीर्यादीत म्हटले आहे की मत संजय,लकी,विकी व महेश हे एकमेकांचे मित्र
असल्याने त्याचे त्यांचे घरी जाणे येणे होते.यातुनच लकी, विकी व महेश यांच्या
नातेवाईक असलेल्या सुनिता,सखुबाई व
कोमल (नावे बदलुन ठेवली आहेत) यांचेशी संजय याची ओळख झाली होती.ओळखीचा फायदा घेवुन वरील तीघीजणी
संजय यास छोट्या मोठ्या कामासाठी घरी बोलवत असत व त्याचे गाडीवर बसुन
फीरून त्यांची कामे घेत जवळकीच्या
करून असत.संजयच्या संबधाचा संशय त्याचे मित्र लकी, विकी, व महेश यांना आल्याने त्यांनी त्यांचे बावडा येथील काका दादा कांबळे यांचे घरी जेवणाचा कार्यक्रम असल्याचे निमंत्रण देवुन
रविवार दिनांक 17 जानेवारी 2021 रोजी संध्याकाळी संजय यास बावडा बोलावुन घेतले होते. हे फिर्यादी यांना माहीत होते.त्या दिवशीपासुन फिर्यादी यांचा मुलगा संजय हा घरी परत न आल्याने फिर्यादी यांनी दिनांक 19 जानेवारी रोजी संजय बेपत्ता असल्या बाबतची तक्रार टेभुणी पोलीस ठाण्यात दीली होती. याच येथे बेपत्ता संजय याचा सर्वत्र शोध घेत असताना गावातील एकाचा फिर्यादी यांचा पुतण्या याला फोन आला व गारअकोले पुलाजवळ भिमा नदीपात्रात पाण्यामध्ये एक प्रेत तरंगत
असल्याचे सांगीतले. त्या ठीकाणी जावुन पाहीले असता पाण्यात हात पाय व डोक नसलेले प्रेत आढळुन आले.सदर ठिकाणी आढळुन आलेली चप्पल, प्रेताचे अंगावरील काळ्या रंगाचा बरमुडा पॅन्ट व जन्मत:असलेल्या खुनावरून सदरचे प्रेत हे फिर्यादी यांचा मुलगा संजय याचेच असल्याची खात्री पटल्याने त्यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात
फिर्याद दिली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की
कांबळे.रा.बावडा, लकी विजय भोसले,
विकी उर्फ व्यंकटेश भोसले व महेश उप्फ शैलेश प्रभाकर सोनवणे यांना सुनिता, सखुबाई व कोमल यांचे व मत संजय याचे असलेले जवळकीच्या संबधाचा संशय घेवुन त्यास दि.17 रोजी जेवणाचे खोटे निमंत्रण दिले. व रात्रीच्या वेळी बावडा गणेशवाडी गावचे हद्दीत,भिमानदीच्या गारअकोले पुलाजवळील नदीपात्रात नेऊन कोणत्यातरी धारदार हत्याराने संजय याचे दोन्ही हात,दोन्ही पाय व डोके तोडुन त्याचा निर्घुन खुन केला.व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे तोडलेले दोन्ही हात,पाय व डोके हे
कोठेतरी फेकुन दीले व मृतदेह (धड ) याची
ओळख पटु नये यासाठी ते भिमानदी पात्रात
फेकुन दीले असल्याचे फिर्यादीत म्हटले असुन पुढील तपास इंदापूर पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर हे करत आहेत.

No comments:

Post a Comment