शेकडो बंजारा व मुस्लिम बांधवानी केला पक्षप्रवेश,डेमोक्रॅटिक RPI ला राज्यात सर्वधर्मीयांकडून प्रचंड प्रतिसाद - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 19, 2021

शेकडो बंजारा व मुस्लिम बांधवानी केला पक्षप्रवेश,डेमोक्रॅटिक RPI ला राज्यात सर्वधर्मीयांकडून प्रचंड प्रतिसाद

शेकडो बंजारा व मुस्लिम बांधवानी केला पक्षप्रवेश,डेमोक्रॅटिक RPI ला राज्यात सर्वधर्मीयांकडून प्रचंड प्रतिसाद

मुंबई (प्रतिनिधी):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाला राज्यातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून बंजारा व मुस्लिम समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश घेतला.

रिपब्लिकन ऐक्याची पहिली हाक देणारे नामांतर लढ्याचे अग्रणी नेतृव असलेले दिवंगत माजी आमदार पँथर टी एम कांबळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील  स्थापन केलेल्या पक्षाला आज भरघोष प्रतिसाद मिळत आहे.

बंजारा समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते वंचित चे उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष भाई शिवा राठोड यांनी नुकताच पक्षप्रवेश केला, त्यांना बंजारा सेल च्या महाराष्ट्र राज्य प्रदेशद्याक्ष पदी पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या हस्ते नियुक्ती देण्यात आली. तर शेकडो मुस्लिम बांधवांनी कनिष्क कांबळे यांचे नेतृत्व मान्य करून पक्षात प्रवेश बिनशर्त प्रवेश घेतला.

उत्तर प्रदेश अध्यक्ष दबीर सिद्दीकी यावेळी उपस्तीत होते, आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी त्यांनी योग्य अशी माहिती पक्ष पदाधिकाऱ्यांना दिली.

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हरिभाऊ कांबळे, युवा राष्ट्रीय सचिव विजय चव्हाण, राज्याचे उपनिरीक्षक श्रीधर गुडधे यांनी नुकताच पक्षाचा पदभार स्वीकारला असून नवा झंजावात व नवचैतन्य पक्षात निर्माण झाले आहे.
 


पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर, कॅ. श्रावण गायकवाड व टीमच्या माध्यमातून रसातळाला गेलेला समाज व अधोगती असलेल्यांना कोणतेच राजकारण माहिती नसलेल्यांना पक्षात संधी उपलब्ध करून सत्तेत सहभागी होण्याचा संकल्प मणी बाळगून कार्यकर्ता सबळ व सत्तेत शीरावा या हेतूने पुढील कामकाज चालू असल्याचे बोलले जात आहे.

No comments:

Post a Comment