बारामतीत होलार समाज संघाची राज्यस्तरीय बैठक संपन्न.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, February 14, 2021

बारामतीत होलार समाज संघाची राज्यस्तरीय बैठक संपन्न..

बारामतीत होलार समाज संघाची राज्यस्तरीय बैठक संपन्न..

माणिकराव भंडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठक.

बारामती :- (दि:१४)होलार समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष माणिकराव भंडगे यांच्या अध्यक्षतेखाली बारामती येथील शासकीय गेस्ट हाऊस येथे होलार समाजाची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील विविध जिल्ह्यातील होलार समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 दरम्यान या  बैठकीत विविध सामाजिक विषयांवर चर्चा करण्यात आली. या मध्ये  बारामतीतील गटई कामगार हे आपली उपजीविका भागवण्यासाठी  भर उन्हात पाऊसात बसून फुटपाथवर काम करत असतात. या ऊन, वाऱ्या पावसापासून संरक्षण मिळवण्यासाठी  त्यांना गटई  स्टॉल मिळून देण्यासाठी चर्मकार विकास महामंळामार्फत  होलार समाजाचे शिष्टमंडळ प्रयत्न करणार आहे .
समाजामध्ये जीवनमान उंचविणे समाज प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळवण्याचा उद्देशाने त्यांचा शैक्षणिक आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबवण्यात येतात त्यांचा लाभ कशा प्रकारे घेता येईल याबद्दल बैठकीमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. होलार समाजामध्ये अनेक तरुण नोकरी तसेच शिक्षणापासून अद्याप ही वंचित राहीले आहे . त्यांना रोजगार उपलब्ध करून  देण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करू तसेच शिक्षण घेत असलेल्या गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत केली जाईल असे आश्वासन देखील  होलार समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष माणिकराव भंडगे यांनी यावेळी दिले.
तसेच फलटण तालुक्यातील उपळवे येथील अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबियांशी चर्चा करून  आरोपीस कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाच्या घरच्यांना  न्याय मिळवून देऊ असे भंडगे यावेळी म्हणाले.  

आयोजित बैठक पार पडल्यानंतर बारामतीतील होलार समाज मंदिराची पाहणी 
माणिकराव भंडगे यांनी केली.  दरम्यान त्यावेळी भंडगे म्हणाले गेले २० ते २५ वर्षा पासुन  होलार समाजाची जी प्रमुख मागणी होती ती म्हणजे समाज मंदीर मिळण्याबाबत ती प्रमुख मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांमुळे पूर्ण झाली. आता लवकरच या समाज मंदिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून हस्ते करून  बारामतीत भव्य दिव्य असा सामुदायिक विवाह सोहळाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे माहिती होलार समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष माणिकराव भंडगे यांनी दिली.

यावेळी होलार समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते  बळंवत माने , बाळासाहेब देवकाते , दत्ता करडे, भारत देवकाते ,बाळासाहेब जाधव, सुधाकर गेजगे , राजाभाऊ माने, संभाजी चौगुले, प्रकाश जावीर, किरण गेजगे, ईश्वर पारसे, पत्रकार गोरख पारसे,  नारायण ढोबळे, शांताराम गुळवे , हिरामण माने, अक्षय माने, महादेव जाधव, केंगार , बंडु आहिवळे पत्रकार सुरज देवकाते यासह होलार समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.


*"उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होलार समाज मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर लवकरच बारामतीत होलार समाजाच्या वतीने भव्य दिव्य असा सामुदायिक विवाह सोहळाचे आयोजन करण्यात येणार आहे"* :-  
       
     

No comments:

Post a Comment