प्रियकरानेच फिर्यादीच्या प्रेमसंबंधातून 8 लाखावर मारला डल्ला... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, March 14, 2021

प्रियकरानेच फिर्यादीच्या प्रेमसंबंधातून 8 लाखावर मारला डल्ला...

प्रियकरानेच फिर्यादीच्या प्रेमसंबंधातून  8 लाखावर मारला डल्ला...                                    बारामती :-अवग्या काही तासापूर्वी झालेल्या चोरीचा शोध बारामती शहर पोलीस स्टेशनने लावला याबाबत सविस्तर असे,  शहरातील फलटण रोड येथे घडलेल्या चोरीच्या घटनेबाबत वेगळाच प्रकार समोर आला आहे. प्रेयसीच्या मदतीने प्रियकराने घरावर डल्ला मारत आठ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. शहरातील फलटण रोड येथील घरात घुसून सासू-
सुनेच्या गळ्याला चाकु लावुन रोख रकमेसह आठ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना दि (14) रोजी दुपारी तीन वाजता घडली. या घटनेचा छडा लावत काही तासांतच पोलिसांनी सत्य समोर आणले.सदर गुन्हा दाखल झालेनंतर बारकाईने तपास केला असता फिर्यादी हिचे लखन गोपाळ भोसले (वय 30 रा. निरावागज ता. बारामती जि. पुणे)याच्याशी प्रेम संबंध होते व त्यास पैशाची अडचण असल्यामुळे त्या दोघांनी मिळून हा बनाव केला असल्याचे निदर्शनास आले आहे.सदरचा गुन्हा उघडकीस आला असून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment