सजीव संरक्षण आणि जागृती बहुउद्देशीय सामाजिक संस्था भारत च्या वतीने कसबा बारामती मध्ये कोविड प्रतिबंध लस केंद्र चालू करण्याची मागणी. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 18, 2021

सजीव संरक्षण आणि जागृती बहुउद्देशीय सामाजिक संस्था भारत च्या वतीने कसबा बारामती मध्ये कोविड प्रतिबंध लस केंद्र चालू करण्याची मागणी.

सजीव संरक्षण आणि जागृती बहुउद्देशीय सामाजिक संस्था भारत च्या वतीने कसबा बारामती मध्ये कोविड प्रतिबंध लस केंद्र चालू करण्याची मागणी.
 
बारामती:-शहर परिसरातील कसबा शाळा क्रमांक २ मध्ये सजीव संरक्षण आणि जागृती बहुउद्देशीय सामाजिक संस्था भारत अंतर्गत वय वर्ष १८ खालील  वय वर्ष ४५ वरील व्यक्तींना कोविड १९ प्रतिबंध लसी करणं केंद्र चालू करण्यासाठी मा.प्रान्त अधिकारी ,मा.आरोग्य अधिकारी नगर परिषद बारामती, डॉ.संदानद काळे वैद्यकीय अधीक्षक सिल्व्हर ज्यू.हाॅस्पिटल बारामती, डॉ.मनोज खोमणे तालुका वैद्यकीय अधिकारी पंचायत समिती बारामती यांच्या कडे लेखी निवेदन दिले आहे.बारामती शहराची लोकसंख्या ही एक लाखाच्या आसपास आहे तसेच कोविडच्या भीतीमुळे नागरिक हे उपचारासाठी दवाखान्यामध्ये जाण्यास टाळाटाळ करत आहेत, त्यामुळे संस्थेच्या अंतर्गत कोविंड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र हे आरोग्य अधिकार्‍यांच्या मदतीने चालू करून गोर गरीब लोकांची लसीकरण होण्यासाठी संस्थेमार्फत जी काही बाह्य मदत लसीकरण केंद्र चालू करण्यासाठी लागणार आहे ती करण्यास संस्था तयार आहे तसेच बारामती परिसरामध्ये कोविड १९ च्या साथीच्या आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून शासकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घ्यावी तसेच लवकरात लवकर कोविड प्रतिबंधात्मक लस उपलब्ध होण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी सजीव संरक्षण आणि जागृती बहुउद्देशीय सामाजिक संस्था भारत च्या वतीने करण्यात आली आहे .

No comments:

Post a Comment