दिवंगत आई चे लहानपणीचे फौजदार होण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या राधानगरी पोलीस ठाणे येथील कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक अनुराधा पाटील.
----------------------------------------------------------
कोल्हापूर दि,15,ऑगस्ट (शशिकांत कुंभार):-.
----------------------------------------------------------
भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या रौप्यमहोत्सवी दिनानिमित्त विविध महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी यांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत.
----------------------------------------------------------
या सांगली जिल्ह्यातील अनेक भूमिपुत्रांनी आपले बलिदान स्वातंत्र्यासाठी 1942 च्या आंदोलनात दिली आहे. क्रांती अग्रणी जी डी लाड बापू यांच्यापासून ते स्वातंत्र्यसैनिक नागनाथ अण्णा नायकवडी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील माजी आमदार वि.स.पागे स्वातंत्र्यसैनिक जयराम कोष्टी,स्वातंत्र्यसैनिक देशभक्त सावळज चे केडगे तात्या तुरुंग फोडून स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाग घेणारे पांडू पाटील मास्तर,स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये स्वतःचे लहान मुलाला झाडाखाली सोडून जाणारे
व पोलिसांच्या अटकेत राहणारे डॉ. कृष्णा तुकाराम हिंगमिरे,इत्यादी अनेक देशभक्तांचा स्वातंत्र्य सैनिकांचा सांगली जिल्ह्यांमधून स्वातंत्र्याच्या योगदाना मध्ये मोलाचा वाटा आहे.
याच मोलाच्या वाट्यांमध्ये विचारांचा खारीचा वाटा उचलत यांच्या विचाराने प्रेरित होऊन स्वातंत्र्याची व देशभक्तीची जाणीव मनात ठेवून सांगली जिल्ह्यातून अनेक भूमिपुत्र प्रशासकीय सेवेत दाखल झाले आहेत.
मोठ्या दिमाखाने अभिमानाने आणि स्वाभीमानाने पारदर्शक काम करण्यासाठी प्रशासकीय सेवेत अनेक जण आपली स्वतःची ओळख निर्माण करू लागले आहेत.
यापैकीच एक सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तालुक्यातील पोलीस उपनिरीक्षक पदावर
ती सध्या कार्यरत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी पोलीस ठाणे येथील लोकप्रिय पोलीस अधिकारी तथा उपनिरीक्षक अनुराधा पाटील अल्पावधीतच यांनी आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
स्वभावने स्पष्ट मितभाषी व मृदू असलेल्या उपनिरीक्षक अनुराधा पाटील या हळव्या मनाच्या संवेदनशील पोलीस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात.तब्बल बारा वर्षे पोलीस सेवेत काम केलेल्या व सध्या राधानगरी पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेल्या अनुराधा पाटील या अवैध व्यवसायिकांच्या कर्दनकाळ म्हणून तालुक्यामध्ये ओळखल्या जातात.
बेकायदेशीर धंदे,अवैद्य व्यवसाय कांचे मुस्क्या बांधणे पर्यंत मिळालेल्या खबरेच्याकडून तात्काळ धाडी टाकून वेळ न दवडता बेकायदेशीर वस्तुंचा साठा उदा. गुटखा विदेशी बनावटीची दारू,इत्यादी जाग्यावरती आढळले साहित्य जप्त करून आरोपींच्या वरती कङक कारवाई करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
covid-19 सारख्या महाभयानक महामारी च्या संकटात संपूर्ण देश सापडला असता राज्य सरकारच्या गृह विभागाचे वतीने जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार कडकलॉकडाऊन मध्ये, covid-19 योद्धा म्हणून त्यांनी आपली भूमिका बजावलेली आहे.दिवसभरातील गस्तीपासून ते रात्रपाळीच्या पेट्रोलिंग पर्यंत, नागरिकांच्या सुरक्षिततेचा कामी 24तास उपनिरीक्षक अनुराधा पाटील यांचे कान आणि डोळे ताजेतवाने असतातसामान्य नागरिक व शेतकरी यांच्याविषयी त्यांना आत्मीयता व तळमळ आहे.समाजातील विविध घटकांशी बांधिलकी सांभाळत असताना त्यांनी रक्तदान शिबिर सारखा राधानगरी पोलिस ठाण्याच्या वतीने राधानगरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.उदय डुबल व वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक श्री.शेख यांचे सहकार्याचे माध्यमातून उपक्रम राबवून,स्वयंस्फूर्तीने त्यात स्वतःहून रक्तदान केले आहे.
जागतिक कृषी दिनाच्या औचित्य साधून राधानगरी पोलीस ठाणे येथील आवारामध्ये वृक्षारोपण स्वतःहून करून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश त्यांनी दिला आहे.
एक कर्तव्यदक्ष प्रामाणिक पोलिस अधिकारी उपनिरीक्षक अनुराधा पाटील यांच्या कार्याची दखल घेत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा राधानगरी तालुका यांचे वतीने covid-19 योद्धा म्हणून अनुराधा पाटील उपनिरीक्षक यांचा सत्कार करण्यात आला होता.
एम.ए.या पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षेतून उत्तीर्ण होऊन आपल्या दिवंगत आईचे फौजदार होण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या उपनिरीक्षक अनुराधा पाटील राधानगरी पोलीस ठाणे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या रौप्यमहोत्सवी दिनानिमित्त क्रांतिकारी सविनय प्रणाम.
No comments:
Post a Comment