मौ.निमटेक येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, August 14, 2021

मौ.निमटेक येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.

मौ.निमटेक येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.


उमरी प्रतिनीधी - गंगाधर गायकवाड
  
उमरी :- तालुक्यातील मौ.निमटेक येथे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जंयती साध्या सोप्या पद्धतीने साजरी करुन अवाढव्य खर्च टाळून ते समाजहितासाठी वापरण्यात येईल असे साहेबराव गव्हाळकर यांनी म्हणाले जंयती मंडळ निमटेक येथील सर्व तरुण थोर मंडळी यांनी सहभागी झाले होते.लोकस्वराज आंदोलनाचे तालुका अध्यक्ष साहेबराव गव्हाळकर यांनी म्हणाले की,ज्या काळात भारत हा एकसंध असा देश म्हणून अस्तित्वातच नव्हता ,अनेक तुकड्यांमध्ये विखुरलेल्या प्रांतांवर वेगवेगळ्या टोळ्यांवर राजेशाही अर्थात एकप्रकारे हुकूमशाह्याच सर्वत्र असताना आणि एका बाजूला समतेसाठी व अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी तन-मन-धन-वेळ न्योछावर करणार्या म.फुलेंचे ब्राह्मणांपासून खंबीरपणे संरक्षण करणारे लहुजी "जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी" असे उद्गार काढीत इतका अमानुष अन्याय-अत्याचार सहन करीत ब्राह्मणांच्या पेशवाईचे रक्षण कसे करतील ? आणि तरीही ते मनुवाद्यांनी लहुजींचे आणि अण्णा भाऊंचे ब्राह्मणीकरण करण्याच्या कामी तन-मन-धनानिशी का लागले  असावेत  ? तर हा डाव ओळखणे सोपे आहे. त्यामागे त्यांचे व त्यांच्या विचारधारेचे प्राणाची बाजी लावून संरक्षण करण्यासाठी आणि सेवेसाठी  बिनपगारी गुलाम तयार करण्यासाठीच होय. कारण पूर्वाश्रमीचा महार बौध्द बनून त्यांच्या हातातून निसटून गेलेला आहे.काही भटके विमुक्त आणि ओबीसीही गेले आहेत.काही जाण्याच्या मार्गावर आहेत.मग आता रहाता राहिली 'मुकी बिचरी कुणी हाका....'अशी बहाद्दर , प्रामाणिक आणि सवाल न करणारी मांग जात ! वरही सामान्य माणसाने विचार करण्याची आवश्यकता आहे.
    या आणि अशा अगणित  प्रश्नांना जन्म देणारं तत्वज्ञान डोळे झाकून स्वीकारून त्यानुसार अंधानुकरण करणारा काळ आणि समाजातील सुशिक्षित असूनही सद्सद्विवेकबुद्धी गहाण ठेवणार्यांचा काळ आणि महत्व आता संपल्यात जमा आहे. त्यानंतर आता राहिलेत ते अशिक्षित, अर्धशिक्षित आणि जाणीवपूर्वक दिशाभूल करण्यात आलेली बिचारी भाबडी पोरं. आता येत आहेत ते तळमळीचे, अभ्यासू, बुध्दीमान आणि संशोधक वृत्तीचे बेडर तरूण ! ते हिरीरिने पुढे सरसावले असून त्यांनी आपल्या संशोधक बुध्दी आणि अभ्यासाने  लहू-फुले-शाहू- बाबासाहेब-अण्णा भाऊ । अशा प्रकारचे एक जालिम रसायन बनविलेले आहे.त्याअनुषंगाने निमटेक येथे नवनिर्वाचित सरपंच सौ विमलबाई पिराजी गव्हाळकर याच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची पुजा,ध्वजारोहण, आरती, श्रीफल फोडून जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी निमटेक येथील बिट अंमलदार पोहेका आर एफ गेडाम सर,एम एल सोनाई, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा राचमाळे सर,पो पा बळीराम चंदापुरे, पत्रकार शेख आरीफ,दिंगाबर सवई, जंयती मंडळ अध्यक्ष रमेश गायकवाड, उपाध्यक्ष लक्षण गव्हाळकर, पिराजी गव्हाळकर, साहेबराव गायकवाड, कैलास गायकवाड, गंगाधर गायकवाड, संतोष गायकवाड, रामदास सरोदे, कोंडीबा गायकवाड, लक्ष्मण धोंडीबा गव्हाळकर, पुंडलिक सुक्रीकर,पोचीराम सुक्रीकर, आनंदा गव्हाळकर, गंगाराम सुक्रीकर, साहेब सुक्रीकर, महाजन गव्हाळकर, लक्ष्मण गायकवाड,पंढरी, गायकवाड, महादू गव्हाळकर, साईनाथ गायकवाड,रामा गव्हाळकर,समाज बांधव 
उपस्थित होते.

No comments:

Post a Comment