दर महिन्याचा वाढीव माल जातो पुरवठाअधिकाऱ्यांच्या खिश्यात.... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 26, 2021

दर महिन्याचा वाढीव माल जातो पुरवठाअधिकाऱ्यांच्या खिश्यात....

दर महिन्याचा वाढीव माल जातो पुरवठा
अधिकाऱ्यांच्या खिश्यात....
धरणगाव:- तालुक्यात रेशनचा महाघोटाळा तहसीलदार आणि पुरवठा अधिकारी यांची
मिलीभगत असून दर महिन्याचा वाढीव माल जातो पुरवठा अधिकार्याच्या खिश्यातजात असल्याचे समजते,धरणगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असतांना यात कश्या प्रकारे हिस्सेदारी ठरली जाते याचे उत्तम उदाहरण किंवा महाराष्ट्रासाठी एक मॉडेल म्हणजे तालुक्याच्या पुरवठा विभागाच्या पुरवठा अधिकारीचा हिस्सा !सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्याचे पुरवठा अधिकारी हे मोठ्या स्वरुपात माया जमा करीत
असले तरी वसुलीचा एक नवीनच फंडा पुरवठा
अधिकारी एस.जी.घुले यांचा आहे.महिनाभारातून
शिल्लक साठ्याचे व वाढीव (Excess) मालाचे एक स्वतंत्र वाहनच त्यांच्या नावाने काळ्याबाजारात विक्रीस जाते. साधारण ७ ते ८ टन मालाचे वाहन ज्यात ३ ते ४ टन तांदूळ आणि ४ ते ५ टन गहू अश्या धान्याचे वाहन हे घुले यांच्या नावावर खपते. सर्वसाधारणपणे बाजारात
या मालाची किमत दोन लाखाच्या जवळपास असते.महिन्याला एक वाहन हे घुले आपल्या खिश्यात घालत असतात.अश्या प्रकारे कमालीचा आणि अनोखा उपक्रम घुले हे करतात तर यासाठी तहसीलदार यांची खुली छुट त्यांना दिली गेली आहे. घुले इतके कर्तव्यदक्ष आहेत कि सुटीच्या दिवशी देखील त्यांचे काम सुरु असते अशी माहिती समजते. क्रमशः

No comments:

Post a Comment