वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने सिद्धेश्वर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथील माता पालक मेळाव्यात निर्भया पथकाचे मार्गदर्शन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, March 12, 2022

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने सिद्धेश्वर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथील माता पालक मेळाव्यात निर्भया पथकाचे मार्गदर्शन..

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने सिद्धेश्वर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथील माता पालक मेळाव्यात निर्भया पथकाचे मार्गदर्शन..
बारामती:- काल ता 12/3/2022 रोजी बारामती निर्भया पथकाने माननीय डी वाय एस पी श्री गणेश इंगळे साहेबांचे मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने सिद्धेश्वर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथील माता पालक मेळावा या कार्यक्रमास उपस्थित राहून सौ अमृता भोईटे महिला पोलीस हवालदार यांनी तेथील पाचवी ते नववी च्या विद्यार्थिनींना व माता पालकांना निर्भया पथक म्हणजे काय निर्भया पथकाचे ध्येय उद्दिष्ट बारामती व इंदापूर तालुक्यामध्ये निर्भया पथक कशा पद्धतीने कार्य करते, वेळ कधी कोणावर कशी येईल हे सांगू शकत नाही त्यामुळे जास्तीत जास्त स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करावा घरातील वातावरण आनंदी व हसत खेळत ठेवावे वयात आलेल्या मुलांची विशेष काळजी घ्यावी त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे जास्तीचे पैसे मुलांना न देणे एखाद्या वस्तूचा हट्ट केला तर ती लगेच न देणे त्या वस्तूचे महत्त्व त्यांना पटवून सांगणे शिस्त लावणे संस्कार करणे थोरामोठ्यांचा आदर करणे ओळखीचे किंवा अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये त्यांचे अत्याचारास बळी पडू नका याची पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यांची उदाहरणांसहित माहिती दिली पोक्सो अॅक्ट,तसेच तक्रार कोठे व कशी द्यावी,न घाबरता व्यक्त व्हावे,अन्याय सहन न करता प्रतिकार करावा तसेच मुली व महिलांची सुरक्षितता याबाबत निर्भया पथक सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे परंतु नैराश्यात जाऊन जीवन संपून नका जीवन एवढे स्वस्त नाही की ते आपण कोणासाठी तरी संपवावे आई-वडिलांचा गुरुवार्यांचा यांचा आदर करणे समोर योग्य ते ध्येय ठेवून ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे वाईट मार्गाला न जाता चांगली संगत धरणे तसेच मुलांना आपल्यावर एखादा गुन्हा दाखल झाला तर पोलीस चारित्र्य पडताळणी मध्ये तसे प्रमाणपत्र देऊन भविष्यात आपल्याला कुठेही सरकारी नोकरी मिळत नाही तरी आपल्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल होणार नाही याविषयी काळजी घ्यावी अशा वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले डायल 112,100,स्थानिक पोलिस स्टेशन यांच्याशी संपर्क साधून अडचणीच्या वेळी पोलीसांची जास्तीत जास्त मदत घ्यावी असे आवाहन केले.सदर कार्यक्रमास सिद्धेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक श्री गावडे सर शाळेचे जनरल बॉडी सदस्य सतीश खोमणे मामा कोराळे गावचे पोलीस पाटील शरद खोमणे थोपटेवाडी गावचे पोलीस पाटील थोपटे शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका पाचवी ते नववी चा विद्यार्थिनी व माता-पालक तसेच प्रमुख पाहुणे सौ.अमृता भोईटे पोलीस हवालदार,पोलीस अंमलदार सोमनाथ कांबळे असे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment