संजय आण्णा सातव यांना भारत रत्न डॉ. बी. आर. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, March 5, 2022

संजय आण्णा सातव यांना भारत रत्न डॉ. बी. आर. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर..

संजय आण्णा सातव यांना भारत रत्न डॉ. बी. आर. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर;

बारामती (गोरख साठेयांजकडून):- सातव नगर हांडेवाडी हडपसर; पुणे येथील भारतीय जनता पक्षाचे नेते व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय तुकाराम सातव यांना भारत रत्न डॉ बी आर आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे भारत सरकार चे राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते डॉ. मनिष गवई यांनी अधिकृत निवड पत्र देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे कळविले आहे. येत्या 9 मार्च 2022रोजी नवी दिल्ली येथे जागतिक महिला दिन सोहळ्याच्या निमित्त्याने विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून संजय आण्णा सातव यांच्या सामाजिक कार्याची दखल दिल्ली येथील • विशाखा वेलफियर सोशिल फाऊंडेशनने घेतली आहे. संजय आण्णा सातव यांनी लॉकडाऊनच्या काळात पुणे परिसरातील अनेकांना मदतीला धावून आले असून असंख्य परीवारांना अन्न धान्य शिधा वाटप केले आहे. हडपसर येथे विविध सामाजिक;धार्मिक कार्यक्रम सुरु करण्यात संजय आण्णा सातव यांनी विशेष योगदान दिले आहे. भारत रत्न डॉ बी आर आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने सर्व स्तरातून संजय आण्णा सातव यांचे अभिनंदन केले जात आहे. आपल्या सामाजिक कार्यात या पुरस्कार जाहीर झाल्याने नवचैतन्य आले आहे असे मत संजय आण्णा सातव यांनी प्रतिपादन केले आहे. सर्व स्तरातून संजय आण्णा सातव यांचे अभिनंदन केले जात आहे.

No comments:

Post a Comment