मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावरईडीची मोठी कारवाई... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 22, 2022

मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावरईडीची मोठी कारवाई...

मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर
ईडीची मोठी कारवाई...                                    मुंबई:- ठाण्यातल्या 'निलांबरी'अपार्टमेंटमधील ११ सदनिका जप्तकरण्यात आली, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीची मोठी कारवाई करण्यात आली,आज सकाळपासून ईडीचे धाडसत्र सुरू आहे. यात मोठ्या कारवाईची शक्यता वर्तवण्यात येत होती आणि झालही तेच.कारण आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्याला ईडीने मोठा दणका दिला आहे, ठाण्यातल्या 11 सदनिका सील करण्यात आल्या आहेत. श्रीधर पाटणकर ज्यांची ठाण्यातली संपत्ती ED ने जप्त केलीय.. यात जवळपास 6.45 कोटींच्या सपत्तीला टाळा लावण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आलंय. महाराष्ट्रात सध्या ईडी अॅक्टिव्ह मोडवर आहे. पुष्पक बिलीयन फसवणूक प्रकरणात ईडीने हा मोठा दणका दिला आहे. यात ईडीने आधीही कोट्यवधी रुपयांची माहिती समोर आणली आहे. यात ईडीने आधीच मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार हा तपास सुरू आहे.

No comments:

Post a Comment