भारतीय कर्मचारी मजदूर युनियनच्या वासीम जिल्हा अध्यक्ष पदी श्रीमती बरखा अल्ताफ बेग यांची नियुक्ती... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, June 5, 2022

भारतीय कर्मचारी मजदूर युनियनच्या वासीम जिल्हा अध्यक्ष पदी श्रीमती बरखा अल्ताफ बेग यांची नियुक्ती...

भारतीय कर्मचारी मजदूर युनियनच्या वासीम जिल्हा अध्यक्ष पदी श्रीमती बरखा अल्ताफ बेग यांची नियुक्ती...                                            नवी दिल्ली:- भारतीय कर्मचारी मजदूर युनियनच्या वासीम जिल्हा अध्यक्ष पदी श्रीमती बरखा अल्ताफ बेग ;संतोषीमाता नगर,मनोरा जि.वासीम यांची नियुक्ती करण्यात आली असून भारतीय कर्मचारी मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रेमपाल गोयल गुरूजी यांनी नियुक्ती पत्र दिले असल्याचे केंद्रीय सचिव प्रा.गोरख साठे बारामती यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. बरखा अल्ताफ बेग यांना नॅशनल वेमेन्स एक्सलन्स अवार्ड महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे जागतिक महिला दिन सोहळ्याच्या निमित्ताने केंद्रीय वित्त राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. भारतीय कर्मचारी मजदूर युनियनचे वासीम जिल्हा अध्यक्ष पदी श्रीमती बरखा अल्ताफ बेग यांची निवड झाल्यावर सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment