बारामती येथील किराणा मालाचे व्यापारी कै. विनोद विजय कुमार वेदमुथा यांचे आकस्मिक दुःखद निधन झाल्याने भावपूर्ण श्रद्धांजली.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, August 4, 2022

बारामती येथील किराणा मालाचे व्यापारी कै. विनोद विजय कुमार वेदमुथा यांचे आकस्मिक दुःखद निधन झाल्याने भावपूर्ण श्रद्धांजली..

बारामती येथील किराणा मालाचे व्यापारी कै. विनोद विजय कुमार वेदमुथा यांचे आकस्मिक दुःखद निधन झाल्याने भावपूर्ण श्रद्धांजली..
बारामती ( विशेष प्रतिनिधी प्रा. गोरख साठे सर याजकडुन):-मूळचे शेळगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील रहिवासी बारामती किराणा माल व्यापारी संघावर कार्यरत असणारे आणि सुप्रसिद्ध किराणा व्यापारी कै. विनोद विजयकुमार यांचे 31.07.2022 रोजी रात्री 9.30 वा.हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय 51 वर्षे होते. कै. विनोद विजयकुमार वेदमुथा हे अतिशय मनमिळावूवृतीचे आणि सर्वसामान्य ग्राहकांची मनोभावी सेवा करणारी होती बहुसंख्य लोक
त्यांच्याकडून किराणामाल उधारीवर नेत असत. तेही मोठ्या आनंदाने उधारीवर किराणा माल देत असत.तांदुळवाडी रस्त्यावरील व्हिल कॉलनी येथे त्यांचे सूपर मार्केटचे दुकान आहे. दि.31.07.2022रोजी रात्री 9.30 वा.
कै. विनोद वेदमुथा यांचे आकस्मित दुःखद निधन झाल्यामुळे बारामती परिसरात सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. कै.विनोद विजयकुमार वेदमुथा यांच्या पश्चात त्यांची आई अरुणा वेदमुथा; पत्नी राखी भाभी,बंधु वैभव वेदमुथा; विशाल; वैभव, मुलगी आकांक्षा व मुलगा अथर्व हे कुटुंब आहे .कै.विनोद विजय कुमार वेदमुथा यांच्या आकस्मिक दुःखद निधनाने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.समस्त मित्र परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

No comments:

Post a Comment