माणुसकीला काळिमा फासणारी घटना, अंध व कर्णबधिर महिलेवर ऊसाच्या फडात नेत शेजाऱ्यानेच केला अत्याचार..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, September 3, 2022

माणुसकीला काळिमा फासणारी घटना, अंध व कर्णबधिर महिलेवर ऊसाच्या फडात नेत शेजाऱ्यानेच केला अत्याचार..!

माणुसकीला काळिमा फासणारी घटना, अंध व कर्णबधिर महिलेवर ऊसाच्या फडात नेत शेजाऱ्यानेच केला अत्याचार..!
लातूर :-माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडत चाललेल्या आहे, महिला अत्याचाराच्या व  गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. राज्यात बलात्कार,अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे पाहायला मिळत आहे.अशीच एक घटना घडली लातूर येथून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका अंध आणि मूकबधिर असलेल्या एका महिलेला ऊसाच्या फडात ओढत नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली.याबाबत मिळालेली माहिती अशी की, गातेगाव या गावात दोन अंध-
मूकबधिर महिला आपल्या भावाच्या कुटुंबासोबत
राहतात. पीडिता आणि आरोपी हे दोन्ही शेजारी
शेजारी राहतात.आरोपीचे नाव बाळासाहेब साबळे असे आहे. त्याने पीडितेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत आरोपी बाळासाहेब हा गेल्या काही दिवसांपासून पीडिता आणि तिच्या बहिणीसोबत घरी येऊन छेडछाड करायचा.
लातूर जिल्ह्यातील गातेगावमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे. पीडित महिलेच्या शेजारीच राहणाऱ्या आरोपीने हे कृत्य केले. त्याने घराजवळील असलेल्या ऊसात ओढत नेऊन या महिलेवर अत्याचार केला. पिडीतेचा आरडा-ओरडा ऐकून काहींनी घटनास्थळाकडे धाव घेतली असता आरोपीने पळ काढला. याप्रकरणी गातेगाव पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. धक्कादायक घटना म्हणजे पोलिसांनी टाळाटाळ केली असल्याचे नातेवाईकांचा आरोप आहे की, पीडिता आणि तिचे नातेवाईक पोलीस ठाण्यात गेल्यानंतर सुरुवातीला गुन्हा दाखल करायला पोलीस कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केली.
गुन्हा दाखल करायला त्यामुळे वेळ लागला, असा
आरोप नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी
केला. या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी पीडितेच्या नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान,माणुसकीला काळिमा लावणाऱ्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे आरोपीच्या विरोधात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.सर्व बाजूनी या नराधमांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment