पोलीस उपनिरीक्षकला ४५ हजाराची लाच घेताना अटक.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, September 2, 2022

पोलीस उपनिरीक्षकला ४५ हजाराची लाच घेताना अटक..

पोलीस उपनिरीक्षकला ४५ हजाराची लाच घेताना अटक..                                        नागपूर:- महाराष्ट्रात लाच घेणाऱ्याचे प्रमाणात वाढ होत असून कारवाई देखील तेवढ्याच प्रमाणात चालू आहे, नुकतीच पोलीस ठाण्याच्या हद्दीतून रेतीची वाहतूक करण्यासाठी
प्रति ट्रक १५ हजारप्रमाणे ५ ट्रकसाठी ७५ हजार रुपये लाच मागून  तडजोडी अंती
४५ हजार रुपये लाच स्वीकारताना  उमरेड तालुक्यातील बेला पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकला नागपूर एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. नागपूर एसीबीच्या पथकाने ही कारवाई रात्री उशीरा बेला परिसरात केली. दिलीप पुंडलिक सपाटे  (वय –५७ रा. फ्रेंड्स कॉलनी, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याबाबत मंगरूळपीर तालुक्यातील तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली. तक्रारदार यांचे पाच ट्रक बेला परिसरातून रेतीची वाहतूक करतात. ही
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सपाटे याने तक्रारदार यांना प्रति ट्रक १५ हजार रुपयेप्रमाणे ७५ हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नागपूर एसीबीकडे तक्रार केली,नागपूर एसीबीच्या युनिटने पडताळणी केली असता पोलीस उपनिरीक्षक दिलीप सपाटे याने ७५ हजार
रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती ४५ हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुरुवारी रात्री बेला परिसरात सापळा रचण्यात आला.तक्रारदार यांच्याकडून ४५ हजार रुपये लाच घेताना सपाटे याला रंगेहात पकडण्यात आले. सपाटे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत बेला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक योगिता चाफले,पोलीस निरीक्षक आशिष चौधरी,पोलीस अंमलदार वर्षा मते, सुरेंद्र शिरसाट, अनिल बहिरे, अस्मिता मल्लेलवार, अमोल मेंघरे, हर्षलता भरडकर यांच्या पथकाने केली.अधिक तपास चालू आहे.

No comments:

Post a Comment