अटक न करता गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन हजार रुपये लाच स्विकारताना पोलिसाला अटक.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, September 2, 2022

अटक न करता गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन हजार रुपये लाच स्विकारताना पोलिसाला अटक..

अटक न करता गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन हजार रुपये लाच स्विकारताना पोलिसाला अटक..                                            कोल्हापूर :- नक्की चाललंय काय लाच घेणारे कशाची लाच घेतील याचा नेम नाही पहा ना अटक वॉरंट निघालेल्या मॅकेनिकलला अटक न करता गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन हजार रुपये लाच स्विकारताना हातकणंगले पोलीस
ठाण्यातील कॉन्स्टेबलला  कोल्हापूर एसीबीने रंगेहात पकडले.नामदेव औदुंबर कचरे (वय – 36) असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या कॉन्स्टेबलचे नाव आहे. ही कारवाई दुपारी हातकणंगले पोलीस ठाण्याच्या आवारात करण्यात आली. ऐन गणेशोत्सवात कोल्हापूर
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. हातकणंगले येथील एका व्यावसायिक असलेल्या मॅकेनिकल विरोधात धारवाड
न्यायालयात  खटला दाखल आहे. न्यायालयीन कामकाजासाठी संबंधित मॅकेनिकल, तक्रारदार हजर राहत नव्हते. त्यामुळे धारवाड न्यायालयाने त्याला अटक वॉरंट बजावले होते.संबंधित आदेशाची प्रत घेऊन हातकणंगले
पोलिसांकडून त्याची अंमलबजावणी मॅकेनिकल
तक्रारदाराच्या घरी गेले. परंतु पोलीस नाईक नामदेव कचरे यांनी तक्रारदार यांच्याकडे अटक वॉरंट प्रकरणात मदत करतो असे सांगून दोन हजार रुपये लाच मागितली तक्रारदाराने कोल्हापूर एसीबीकडे लेखी तक्रार केली. आज सकाळी सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये लाच घेताना पथकाने कचरे याला रंगेहात पकडले. हातकणंगले पोलीस
ठाण्याच्या परिसरातच ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी कचरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश
बनसोडे अप्पर अधीक्षक सुरज गुरव पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार पोलीस उपनिरीक्षक संजीव बंबर्गेकर, पोलीस अंमलदार शरद पोरे,विकास माने, सुनील घोसाळकर, नवनाथ कदम, मयूर देसाई, विष्णू गुरव यांच्या पथकाने केली.

No comments:

Post a Comment